रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इन्स्टाग्राम रिल्स बनवते म्हणून पतीने पत्नीला दिली ही शिक्षा

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2022 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
Instagram

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पत्नी सोशल मीडियावरील रिल्स बनवण्यात बराच वेळ वाया घालवते या रागातून तमिळनाडूमध्ये पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात अतिशय हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुपपूर जिल्ह्यामध्ये अमर्थलिंगम असं या ३८ वर्षीय आरोपीचं नाव असून मृत महिलेचं नावं चित्र आहे. हे दोघेही तिरुपपूरमधील सालीम नगर येथे वास्तव्यास होते. हातावर पोट असणारा अमर्थलिंगम मजूरीचं काम करतो. थेनामाम पल्लयाम येथील भाजी मंडईमध्ये अमर्थलिंगम हमाल आहे. चित्रा ही एका कापड कारखाण्यामध्ये काम करायची. तिला सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची सवय होती. टीकटॉक आणि इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर ती रिल्स बनवून पोस्ट करायची. तिची ही सवय पतीला खटकायची. यावरुन अनेकदा दोघांमध्ये वादही झाले होते.

चित्रा सोशल मीडियावरील रिल्ससाठी खूप वेळ वाया घालवते असं अमर्थलिंगमचं म्हणणं होतं. अनेकदा तो भांडणात हे बोलूनही दाखवायचा. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आणि संपर्कांमधून माणसं जोडली गेल्याने चित्राने अभिनयामध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने चेन्नईमधील कापड कारखान्यातील नोकरी दोन महिन्यांपूर्वी सोडली होती. इन्स्टाग्रामवर तिचे ३३ हजार ३०० हून अधिक फॉलोअर्स आहेत.

गेल्या आठवड्यामध्ये मुलीच्या लग्नानिमित्त चित्रा मूळ घरी म्हणजेच तिरुपपूरमधील सालीम नगर येथे आली होती. मात्र ती लग्नानंतर पुन्हा चेन्नईला जाण्यासाठी निघाली तेव्हा तिला अमर्थलिंगमने विरोध केला. याच विषयावरुन दोघांमध्ये रविवारी रात्री विकोपाचा वाद झाला. चित्राने सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करणे सोडून द्यावे आणि अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा विचारही सोडून द्यावा असं अमर्थलिंगमचं म्हणणं होतं. याच वादामधून दोघांमध्ये हाणामारी झाली. रागाच्याभरात अमर्थलिंगमने शालीने चित्राचा गळा आवळला.

गळा आवळल्याने चित्रा बेशुद्ध पडली. घाबरलेल्या अवस्थेतच अमर्थलिंगम चित्राला बेशुद्धावस्थेत सोडून घरातून पळून गेला. नंतर चित्राचा मृत्यू झाला. अमर्थलिंगमने आपल्या मुलीला आपण चित्रावर हल्ला केल्याची माहिती फोनवर दिली. चित्राची मुलगी आईला पाहण्यासाठी घरी पोहोचली तेव्हा चित्राचा मृतदेह घरात आढळून आला. तिने पोलिसांना याबाबतीत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि अर्थलिंगमला पेरुमन्नालुरुमधून अटक केली. या प्रकारामुळे सोशल मीडियामुळे पती – पत्नीत होणारा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

Crime Instagram reels Husband Wife Punishment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता आयोजित होणार भरपूर रोजगार मेळावे; राज्य सरकारने घेतला हा निर्णय

Next Post

कपिलधार तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणार ही विकासकामे; पालकमंत्र्यांनी केली महापूजा

Next Post
kapildhar 6 1140x570 1

कपिलधार तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणार ही विकासकामे; पालकमंत्र्यांनी केली महापूजा

ताज्या बातम्या

PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011