नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या संपूर्ण जग जणू काही सोशल मीडियामध्ये झाले असून आताच्या तरुण पिढी तर त्याच्या अत्यंत आहारी गेली आहे, असे दिसून येते त्यातून सायबर क्राईम सारख्या घटना देखील घडत असतात. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आदिंवर आपले मेसेज फोटो टाकण्याची जणू काही स्पर्धा सुरू झाली असते. त्यातूनच नवी दिल्ली येथे एका अल्पवयीन तरुणीने इंस्टाग्रामवर माझे फॉलोअर्स जास्त आहेत, असा वाद घालत रागाच्या भरात आपल्या एका अल्पवयीन मित्राचा चक्क खून केला. विशेष म्हणजे यासाठी तिने आपल्या भावासह दुसऱ्या मित्रांना आपल्या बाजूने मन वळवत या कटात सामील करून घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साहिल (वय १७ ) या अल्पवयीन तरुणाचे सविता (वय १६ , तिचे नाव येथे बदललेले आहे ) तिच्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यातून त्याचबरोबर मित्राचा एक ग्रुप तयार झाला, ते रोज सोशल मीडियावरून एकमेकांना फोटो व मेसेज पाठवत होते. त्यातच साहिलने एके दिवशी माझे इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत, असे सांगितले. त्याचा सविताला राग आला आणि तिने माझे फॉलोअर्स जास्त असल्याचे सांगितले. त्या दोघांमध्ये खूप वाद झाला, त्या वादातून या तरुणीने साहिलचा खून करण्याचा कट रचला.
तसेच या तरुणी आपले इतर मित्र आणि तिचा भाऊ यांना देखील काहीतरी खोटेनाटे सांगून आपल्या कटात सामील करून घेतले आणि एक दिवस पार्टीमध्ये सर्वजण जमले असताना किरकोळ कारणावरून सर्वांनी साहीलला बेदम मारहाण करीत त्याचा चाकूने खून केला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता त्यांना साहिलच्या गळ्यावर चाकूच्या खुणा दिसल्या. सोशल मीडियावर स्पर्धेतून किंवा अन्य कोणत्याही मैत्रीच्या वादातून हा खून झाला असावा अशी पोलिसांना वाटते, याप्रकरणी अधिक तपास सुरू असून या सदर तरुणी आणि तिचा भाऊ व इतरांना अटक करण्यात आली आहे.
Crime Instagram Followers Minor Girl