इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीचे प्रेमाचे संबंध असतात, हे सर्वांना माहीत असते. त्यांनी एकमेकांवर प्रेम करणे , त्याचप्रमाणे शारीरिक संबंध देखील ठेवणे कायद्यानुसार योग्यच ठरते. परंतु काही पती हे विकृत मनोवृत्तीच्या असतात, ते आपल्या पत्नीच्या पत्नीला मानसिक त्रास देतात, इतकेच नव्हे तर पत्नीला दुसऱ्या पुरूषांसोबत किंवा मित्रांसोबत देखील शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडतात, अशा घटना अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी घडताना दिसतात, अशाच प्रकारची घटना उत्तर प्रदेशात घडली.
गोरखपूर जिल्ह्यातील एका महिलेने तिच्या पतीवर बलात्कार, मारहाण, हुंड्यासाठी छळ यासह बलात्काराचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पतीने आपल्या मित्राकडूनही महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. आता आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील जंगल चावरी येथील रहिवासी महिलेने तिच्या तक्रारीमध्ये म्हटले की, तिचा पती गेल्या ६ महिन्यांपासून दारूच्या नशेत आपल्या मित्रासोबत घरी येतो आणि संमतीशिवाय तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतो. यासोबतच तो त्याच्या मित्रासोबत शारीरिक संबंधही ठेवतो. प्रतिकार केल्याने तिला मारहाण केली जाते.
एवढेच नाही तर पतीने जीवे मारण्याची आणि घराबाहेर हाकलून देण्याची धमकी दिली. हुंड्यासाठीही तिचा छळ केला जातो. याप्रकरणी गावात पंचायतही झाली, पण पतीमध्ये काहीही सुधारणा झाली नसल्याचे पीडितेने सांगितले. एक दिवस तिचा पती हा या मित्रासोबत घरात आला आणि दोघांनीही मारहाण केल्यानंतर तिच्यावर बळजबरीने आळीपाळीने बलात्कार केला आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केली असून दोन्ही विकृत पुरुषांचा तपास करण्यात येत आहे.
Crime Husband Wife Rape Sexual Harassment Uttar Pradesh Gorakhpur