इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीमध्ये विश्वासाचे नाते असले तरच प्रेमाला अर्थ असतो, बिहारमधील पूर्णिया येथे एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात या महिलेचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला.
याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच या हत्याकांडाचा तपास सुरू केला. घटनास्थळावर पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली. त्यामध्ये पती असताना परपुरुषाशी संबंध ठेवण्याचा हाच परिणाम होतो, असं लिहिलं होते. या पत्राच्या खाली नीरज असं नाव लिहिलेलं होतं. नीरज हे मृत कल्याणी हिच्या पतीचं नाव आहे.
पतीने या महिलेची वजनदार हत्याराने वार करून हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. मृत महिलेचा मोबाईलसुद्धा पतीकडे आहे. एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी सांगितले की, या हत्येचा संशय हा पतीवरच आहे. त्यांनी सांगितले की, मृत महिला कल्याणीचं सासर बडहरा कोठी ठाण्याच्या क्षेत्रात आहे. मृत महिला येथे एका खासगी एक्स रे सेंटरमध्ये काम करत होती.
कल्याणीसोबत राहणारी तिची मैत्रीण जेव्हा घरी आली तेव्हा तिने कल्याणीचा मृतदेह घरात पडलेला पाहिला. त्यानंतर याची सूचना घरमालकाला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वीच या महिलेच्या चार वर्षांच्या मुलाला आजोबांनी आपल्याकडे नेले होते. दरम्यान, हत्या झाली त्या दिवशी कल्याणीचा पती नीरज तिथे आला होता. त्यानेच कल्याणीची हत्या केली आणि मोबाईल घेऊन फरार झाला, असा संशय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Crime Husband Wife punishment Police Investigation
Bihar Purniya Murder