नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गाझियाबादच्या मधुबन बापुधाम पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या संजय नगरमध्ये संतप्त पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलीच्या साथीने पतीची निर्घृण हत्या केली. मात्र, अवघ्या काही तासांतच या खुनाच्या गुन्ह्याची उकल करत पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी पत्नी शालूने सांगितले की, तिचा पती अमित वर्मा याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. अमित त्याच्या प्रेयसीसोबत सेक्स करताना पत्नीला व्हिडिओ कॉल करत असे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय नगर सेक्टर-२३ येथील एम-ब्लॉकमध्ये राहणारे ४० वर्षीय ज्वेलर अमित वर्मा यांच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला करण्यात आला. रविवारी पहाटे अमितचा मृतदेह त्याच्या कारमध्ये पडलेला आढळून आला. कारच्या आत आणि घटनास्थळाच्या आजूबाजूला रक्ताचे डाग आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित वर्मा शनिवारी रात्री सहारनपूरला जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. मधुबन बापुधाम पोलिस स्टेशन हद्दीत, रविवारी पहाटे ४ वाजता फॅंटम-स्वार पोलिस गस्तीवर निघाले. त्याचवेळी कमला नेहरू नगरमध्ये एक वॅगनआर कार रस्त्यावर उभी केलेली आढळली. तपासणी केली असता कारमध्ये एक युवक मृतावस्थेत आढळून आला, त्याचे नाव अमित वर्मा असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित वर्माचा डोक्यात जड वस्तूने वार करून खून करण्यात आला आहे. कारमध्ये रक्ताचे डागही आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. प्राथमिक तपासात पोलिसांना मृत व्यक्तीचे अन्य कोणत्या तरी महिलेशी संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी मृताच्या पत्नीची चौकशी केली असता तिच्या बोलण्यात विरोधाभास आढळून आला. तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पतीचे अनैतिक संबंध असल्यानेच तिने पतीचा खून केल्याचे कबूल केले.
तिने पोलिसांनी सांगितले की, घरात पतीची हत्या केल्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकला. त्यानंतर खुनाचा मागमूस लपविण्यासाठी पत्नी व मुलीने प्रयत्न केले. रक्ताने माखलेली गादी रात्रीच धुतली आणि ती टेरेसवर वाळवली. शिवाय रक्ताचे डाग पडलेल्या घराच्या पायऱ्याही धुतल्या.
Crime Husband Wife Extra Marital Affair Murder