इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखादा व्यक्ती विकृत मनोवृत्तीचा असेल तर काय करेल याचा नेम नाही. स्वतःच्या जीवाभावाच्या माणसाचा देखील तो छ्ळ करू शकतो. कोणाला स्वप्नातही वाटणार नाही, अशा प्रकारे फ्रान्समधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला दुसऱ्यांच्या लैगिंक छळाचे शिकार बनविले. त्याने चक्क आपल्या मित्रांना पत्नीवरच बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर नशेत असलेल्या बायकोवर होणाऱ्या बलात्काराचे व्हिडीओही शूट केले आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे तो मागील १० वर्षांपासून आरोपी पती आपल्या पत्नीला जेवणातून ड्रग्ज देत होता. नशेत असलेल्या या अबला महिलेवर ५१ जणांनी तब्बल ९२ वेळा बलात्कार केला आहे.
अखेर अटक
एका वृत्तानुसार, विकृत नराधम आरोपी नाव डॉमिनिक पी. हा आरोपी आपल्या पत्नीला दररोज रात्री जेवणातून अंमली पदार्थ देत असे. आरोपीने नशेत असलेल्या पत्नीवर अनेक पुरुषांकडून सुमारे १० वर्षे बलात्कार करायला लावल्याचा आरोप आहे. मागील दहा वर्षात ९२ बलात्काराच्या घटनांची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. बलात्कार करणाऱ्यांमध्ये २६ ते ७३ वर्षे वयोगटातील ५१ पुरुषांचा समावेश आहे. या आरोपींमध्ये अग्निशामक दलाचे जवान, ट्रक चालक, नगरसेवक, बँक-आयटी कंपनींमधील कर्मचारी, तुरुंगरक्षक आणि पत्रकार अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलीस इतर आरोपी पुरुषांचा शोध घेत आहेत.
व्हिडीओही केले शूट
विकृत आरोपी डॉमिनिक आणि त्याची पीडित पत्नी यांच्या लग्नाला ५० वर्षांहून अधिक काळ झाला आहे .असून त्यांना तीन मुलंही आहेत. मात्र मनोवृतीचा आरोपी हा आपल्या पत्नीच्या जेवणात ‘अँटी-अँझायटी’ औषध मिसळून देत असे, या ड्रग्जमुळे पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर पती कथित आरोपींना पाहुणे म्हणून घरी बोलवायचा. त्यानंतर बेशुद्धावस्थेतील पत्नीवर कथित पाहुण्यांना बलात्कार करायला लावायचा. एवढेच नव्हे तर या नराधमाने या बलात्काराचे गुपचूप व्हिडीओही शूट केले आहेत. त्याने यूएसबी ड्राइव्हमध्ये एक फाइल तयार करून यामध्ये बलात्काराचे व्हिडीओज व्हायरल केले आहे. पोलिसांनी हा यूएसबी ड्राईव्ह जप्त केला आहे.