इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती पत्नीचे भांडण घरोघरी होत असते, परंतु थोड्याच वेळात ते मिटतात आणि पुन्हा गोडवा निर्माण होतो, संसारात रुसवे-फुगवे राग, भांडण होतच असतात. परंतु एखादे भांडण विकोपाला गेले तर त्यातून वाईट परिणाम देखील होऊ शकतात. काही पुरुष आपल्या पत्नीवर अत्याचार करतात. दिल्ली शहरातील अशीच एक घटना घडली.
एका इसमाने पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केले त्याला पहिल्या पत्नीपासून चार मुले आणि दुसऱ्या पत्नीपासून ही चार मुले आहेत. पहिली पत्नी सोडून गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीशीही भांडण झाले आणि तीही त्याला सोडून गेली, त्याने खूप विनंती केल्यावर तिने सांगितले की, मी घरी येते पण मुलांचे संगोपन नीट करावे लागेल. परंतु दोघांमध्ये त्यातून वाद झाला आणि भांडण इतके विकोपाला गेले की त्याने त्याच्या दुसर्या पत्नीचा गळा दाबून खून केला. आणि नंतर पोलिस ठाण्यात जाऊन स्वतःला आत्मसमर्पण केले.
आरोपीने पोलिसांना हा संपूर्ण प्रकार क्रमाने सांगितला. पोलिसांनी सांगितले की, मुकुंदपूर भागातील कपिल विहार येथे रविवारी एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. विजय (३८) मुलगा दया राम असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. चौकशी केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घरात संतोषी देवी नावाच्या महिलेचा मृतदेह कपड्यात गुंडाळलेला असल्याचे आढळले.
पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान विजयने दोन लग्न केल्याचे पोलिसांना समोर आले. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. दुसरी पत्नीही ४ मुलांसह पतीपासून वेगळी राहत होती. कालांतराने सर्व मुलांच्या संगोपनाच्या काही किरकोळ गोष्टींवरून विजय आणि संतोषी यांच्यात मारामारी झाली.
दरम्यान, रविवारी सायंकाळी संतोषी आपल्या कामावरून परतली आणि रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. सर्व मुले तळमजल्यावर झोपली होती आणि विजय आणि संतोषी टेरेसवर एकटेच होते. दरम्यान, भांडण इतके वाढले की, आरोपीने संतोषीचा गळा आवळून खून केला. आणि तिचा मृतदेह कापडात गुंडाळला, आणि त्याने पोलीस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आणि पुढील तपास सुरू आहे.
crime husband killed second wife parenting police fir Delhi