पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पती-पत्नीचे नाते हे अत्यंत पवित्र मानले जाते. दोघांना सहजीवन साथी म्हटले जाते. त्यामुळे दोघांनी एकमेकांवर प्रेम करावे, एकमेकांना जीव लावावा, हे नैतिक दृष्ट्या योग्य मानले जाते. विशेषतः पतीने पत्नीची काळजी घेणे गरजेचे ठरते. परंतु काही वेळा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्ती आपल्या पत्नीला त्रास देतात. पुणे शहरामध्ये एका पतीने तर कहरच केला. आपल्या पत्नीला आपल्या मित्रांसमोर शारीरिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एक भयानक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीने स्वतःच्या ४८ वर्षीय पत्नीला आपल्या दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे शारीरिक संबंध ठेवत असताना पती स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पती आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी पतीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी मानसिक त्रास दिला. तसेच तिची इच्छा नसतानाही डिसेंबर २०२० मध्ये एका लॉजवर एका मित्राबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये एका फ्लॅटवर आणखी एका मित्रासोबत पत्नीला अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान, हे सर्व घडत असताना आरोपी स्वतः त्या ठिकाणी ते सर्व अनैतिक प्रकार पाहत होता. या सर्व प्रकरणानंतर फिर्यादी महिलेने अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पतीसह त्याच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.