सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात एका पोलीसाने खेळाडू असलेल्या तरुणीचा पाठलाग करून छेड काढण्याचा प्रयत्न विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर महिला अत्याचार नियंत्रणासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला अत्याचाराचे बहुतांश गुन्हे हे ओळखीच्या व्यक्तींकडूनच झाले आहेत. हे प्रमाण ९३ टक्क्यांहून अधिक आहे. याशिवाय सर्वच गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. अशीच एक धक्कादायक घटना सातारा शहरात घडली. बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकाॅर्डिंग केले असून, पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एक ३४ वर्षीय महिला एका रुग्णालयात काम करते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या महिलेचा पती तिचा शारीरिक मानसिक छळ करीत होता. त्याने वाहन घेण्यासाठी माहेराहून पैसे आण असा तगादा सुरू केला होता. आणखी भयानक गोष्ट म्हणजे या पुरुषाचे तथा पतीचे विवाहबाह्य संबंध होते, याची माहिती त्याच्या पत्नीला कळाली होती. या विवाहबाह्य संबंधाबाबत पत्नीने विचारणा केली असता मुलांना विष देऊन जीव देर्इन व तुझ्या वडिलांना खडी फोडायला पाठवीन, अशी वारंवार धमकी देत होता.
इतकेच नाही तर त्याची पत्नी काम करत असलेल्या रुग्णालयात जाऊन गोंधळ करण्याची धमकीही हा माणूस देत होता. त्यानंतर एके दिवशी बेडरुममध्ये या पती महाशयाने छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकाॅर्डिंग केले. सदर भयानक प्रकार समोर आल्यानंतर पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे. आता या गंभीर संवेदनशील प्रकरणाचा महिला पोलिसांकडे तपास देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अशाच प्रकारच्या घटना काही दिवसांपूर्वी कानपुर आणि इंदूर शहरात देखील घडल्या होत्या. कानपूरमध्ये शहरातील एका सराफा व्यावसायिकाने घरात बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कॅमेरे लावले आणि नंतर पत्नीचे व्हिडिओ व्हायरल केले होते. एवढेच नाही तर पत्नीला मारहाण करून अमानुष अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे इंदूरमध्ये एका महिलेचा पती तिच्यावर अत्याचार करत असे. रात्री तो त्याच्या खासगी क्षणांचे व्हिडिओही बनवत असे. त्याने बाथरूम आणि रूममध्ये इंटेलिजन्स कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यांमधून रेकॉर्ड केलेले व्हिडिओ दाखवून तो पत्नीला ब्लॅकमेल करत असे. तसेच हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी पती याने पत्नीकडे कोट्यवधी रुपयांची मागणी करत होता. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली होती.
Crime Husband Bedroom Hidden Camera Wife