इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती पत्नीचे नाते हे विश्वासाचे असते परंतु काही अविचारी पुरुष आपल्या पत्नीवर विनाकारण संशय घेतात आणि त्या संशयावरून पत्नीला मारहाण देखील करतात. राजस्थानमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. बांसवाडा जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे.
एका महिलने वाटेत मित्राकडून गाडीवर लिफ्ट घेतली. हे महिलेच्या नवऱ्याला समजल्यावर त्याचे डोके फिरले. यानंतर नवऱ्यानं महिलेला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2 अल्पवयीन आहेत. या आरोपी नराधम पतीने आपल्या पत्नीला झाडाला बांधून जबर मारहाण केलीय. इतकी क्रूर शिक्षा करण्याचे कारण अगदी किरकोळ आहे. यातील एका व्हिडीओत एका तरुण आणि तरुणीला झाडाला बांधून मारहाण करत असल्याचे सप्ष्टपणे दिसते आहे. अनेक जण अमानुषपणे या दोघांना मारहाण करत असल्याचे या व्हिडीओत आहे.
https://twitter.com/Surjeet07612751/status/1553301558141456384?s=20&t=z0U1P4vYgJjArlfJ5on3MA
सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. रात्री सुमारे दोनच्या सुमारास पती-पत्नीला शोधून काढण्यात आले. पीडित महिलेने रात्री एफआयआर दाखल केली. पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या पतीला बोलावण्यात आले. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, पती महावीर, दीर कमलेश, भावजय सुंका आणि मामे सासऱ्यांनी या दोघांना दांडक्यांनी आणि बुटांनी मारहाण केली. या महिलेला सात तास झाडाला बांधून ठेवण्यात आले त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली.
Husband Beaten Wife for this reason Video Viral
Rajasthan Jaipur Crime Baswada