इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हॉरर चित्रपट बघण्याची सवय असलेल्या एका तरुणाने मोठा निर्णय घेतला आणि त्याची सध्या देशभरात मोठी चर्चा होत आहे. अरुंधती हा हॉरर चित्रपट केवळ एक-दोनदा नाही तर तब्बल १५ वेळा बघून २३ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. तब्बल २० लिटर पेट्रोल अंगावर टाकून त्याने स्वतःला जाळून घेतले आहे.
कर्नाटकातील टुमकारू जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एक तरुण अरुंधती चित्रपटाची कॉपी करत होता. अरुंधती हा एक तेलुगू हॉरर चित्रपट आहे. तरुणाने हा चित्रपट तब्बल 15 वेळा पाहिला आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम झाला. चित्रपटाच्या नादात त्याने अकरावीनंतरचे शिक्षणही सोडले. रेणुका प्रसाद असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अभ्यासात खूप हुशार होता आणि नेहमी त्याच्या वर्गात पहिला क्रमांक पटकवायचा. त्याला या चित्रपटाचे इतके व्यसन लागले की त्याने आपले शिक्षणही सोडले. घरच्यांनी त्याला चित्रपट पाहण्यास मनाई देखील केली. पण, त्याने ऐकलं नाही. हा तरुण त्याच्या कुटुंबीयांशी चित्रपटाची कॉपी करण्याबाबत बोलायचा. मात्र, घरच्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तरुणाने चित्रपटातील एक दृश्य कॉपी करण्याचा प्रयत्न केला.
अरुन्धती नावाचा तेलगू हॉरर सिनेमा 15 वेळा पाहि्ल्यानंतर, एका तरुणाने स्वत:वर पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकात टुमकारु जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. अरुन्धती हा सिनेमा पाहून 23 वर्षांच्या तरुणावर मोठा मानसिक परिणाम झाला होता. या सिनेमात असलेले भूत त्याच्यावर स्वार झाल्यासारखे झाले होते. या भुताचा त्याच्यावर इतका परिणाम झआला की त्याने त्याचे एकरावीचे शिक्षणही मध्येच सोडून दिले होते. या तरुणाची ओळख रेणुका प्रसाद अशी पटली आहे. विशेष म्हणजे रेणुका प्रसाद हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता, आणि तो त्याच्या वर्गात नेहमीच पहिला येत असे. त्याला सिनेमाचे व्यसन लागल्यासारखे झाले होते. तसेच सिनेमासाठी त्याने अभ्यास करणेही सोडून दिले होते.
सिनेमा पाहण्यासाठी त्याचे कुटुंबीय त्याला मनाई करीत मात्र तो ऐकतच नव्हता. जसे सिनेमात होते आहे, तसेच आपल्या कुटुंबीयांनीही वागावे, अशी त्याची अपेक्षा होती. त्याच्या कुटुंबीनियांनी त्याला समजावयाचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर थेट त्याने स्वताला आग लावून घेतल्याची माहितीच कुटुंबीयांना मिळाली आहे. वाईट गोष्ट म्हणजे या तरुणाने अरुन्धती सिनेमातील एक सीन कॉपी करण्याचा प्रयत्न केला. सिनेमातील हिरो प्रमाणे, रेणुका प्रसादने बुधवारी गावाबाहेर जाऊन आपल्या शरिरावर 20 लिटर पेट्रोल टाकून घेतले. त्यानंतर त्याने स्वतालाच आग लावून घेतली. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांनी त्याला आगीच्या ज्वाळात पाहिल्यानंतर त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तो यात 60 टक्के भाजला होता.
दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या वडिलांचा याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कोडिनेगहल्ली पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची आता ते चौकशी करीत आहेत. रेणुका प्रसादचे कुटुंबीय वयात आलेल्या मुलाच्या आत्महत्येने दु:खी झाले आहेत. त्याच्या मृत्यूवार्तेने शेजारचे नागरिक व त्याचे मित्रही हळहळले आहेत. रेणुका प्रसादने चांगले शिक्षण घेऊन चांगले करिअर करावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. दुर्दैवाने सिनेमाच्या व्यसनाने त्याचा मृत्यू झाला. तेलगू सुपरहिट सिनेमा अरुन्धतीत अभिनेत्री आपल्या इच्छेने मरते आणि शत्रुंचा बदला घेण्यासाठी ती पुनर्जन्म घेते. या सिनेमापासून प्रेरणा घेत, रेणुका प्रसादही स्वताला संपवून पुन्हा पुनर्जन्म घेण्याच्या विचारात होता. त्यातून त्याचा बळी गेला आहे.
Crime Horror Movie Youth Rebirth Big step
Burn Alive Himself Petrol Ghost