इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हरियाणातील मेवातमध्ये पोलिस उपअधिक्षक (डीएसपीला) डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डीएसपी सुरेंद्र सिंह अवैध खाणकाम रोखण्यासाठी पोहोचले होते. परंतु माफियाच्या लोकांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. नूह पोलिसांनी सांगितले की, सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना अवैध खाणकामाची माहिती मिळाली होती आणि ते तपासासाठी घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी अवैध उत्खननात गुंतलेला एक ट्रक त्यांच्यावर चढवण्यात आला. आरोपींचा शोध सुरू आहे.
डीएसपी सुरेंद्र सिंह लवकरच निवृत्त होणार होते. सध्या मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. या घटनेत आणखी एका ट्रकचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून आजूबाजूच्या परिसरात चालकाचा शोध सुरू आहे. वृत्तानुसार, ट्रक्सना खणून काढलेले दगड वाहतूक करण्याचा अधिकार नव्हता. डीएसपींनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक त्याच्यावर ढकलला. मारेकरी लवकरच पकडले जातील आणि कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन हरियाणा पोलिसांनी ट्विटमध्ये दिले आहे.
https://twitter.com/ANI/status/1549310012689764352?s=20&t=ycK-6qcyNyOSye4ujMQNhw
Crime Haryana Police DSP Killed under Dumper Illegal Mining Nuh