इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसात बिहारमध्ये गुन्हेगारी मध्ये प्रचंड संख्येने वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कारण भर दिवसा एका तरुणीवर गोळ्या झाल्याची नुकतीच घटना घडली असून या प्रकरणामुळे सर्वत्र हळूहळू उडाली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे अज्ञात गुन्हेगारांनी भाजी विक्रेत्याच्या १६ वर्षांच्या मुलीवर गोळ्या झाडल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रपुरी मोहल्ला येथून कोचिंगचा अभ्यास करून विद्यार्थी घरी परतत असताना, त्याचवेळी ही घटना घडली. मुलीच्या मानेवर गोळी लागली, त्यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलीवर उपचार सुरू असून हे प्रकरण प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाटणामधील बेऊर पीएसच्या सिपारा भागातील इंद्रापुरी परिसरात एका भाजी विक्रेत्याच्या मुलीवर गोळी झाडली. मानेवर गोळी लागल्याने जखमी झालेल्या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण प्रेमप्रकरण असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वृत्तीबद्दल स्थानिकांमध्ये नाराजी पसरली. बिहारमधील प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यापूर्वीही ढिलाई होती. सरकार बदलाचा परिणाम आता स्पष्ट दिसत आहे. सरकार बदलताच गुन्हेगार बेधडक झाले असून अशा घटना रोज पहायला मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याआधी दि. 10 ऑगस्ट रोजी बिहारमध्ये एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दि.11 ऑगस्ट रोजी आणखी एका पत्रकाराची हत्या करण्यात आली आणि बेतिया येथील एका पुजाऱ्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. 11 ऑगस्ट रोजी पाटणा येथील एका कार शोरूममध्ये मोठा दरोडा पडला होता आणि त्याच दिवशी छपरा येथे बनावट दारूच्या सेवनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला होता. बिहारमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Crime Gun Fire on Young Girl Police Investigation
Bihar Patna