इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक कठोर कायदे असूनही महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. याउलट त्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे भयानक चित्र समोर येत आहे. बिहारसारख्या राज्यात तर महिलांवर बलात्काराच्यात घटनांचा आलेख दरवर्षी चढाच आहे. आता तर निर्भयापेक्षा गंभीर प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे, न्यायालयानेच तशी टिपण्णी केली आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी अशाच अल्पवयीन मुलीसह एका तीन महिलांवरील बलात्कार प्रकरणी चार जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
बिहारमधील सुपौल येथे अल्पवयीन मुलीसह तीन महिलांवर सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या हत्येप्रकरणी सुपौल न्यायालयाने चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. सन 2019 मधील या कुप्रसिद्ध प्रकरणातील सर्व आरोपी छत्तपूर हद्दीतील नरहैया येथील रहिवासी आहेत. विशेष न्यायाधीश (पोक्सोविभाग) आलोक कौशिक पाठक यांच्या कोर्टाने ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ मानली.
न्यायालयाने अनमोल यादव, अलीशेर, अयुब आणि जमाल यांना फाशीसह प्रत्येकी 20 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच दंड न भरल्यास दोन महिने कारावास भोगावा लागणार आहे. यासोबतच अलीशेर, अयुब आणि अनमोल यादव यांना POCSO कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
यापुर्वी कनिष्ठ न्यायालयाने चौघांना जन्मठेप (शेवटच्या श्वासापर्यंत) दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. तसेच बलात्कारापूर्वी दरोडा टाकल्याप्रकरणी त्याला 10 वर्षे कारावास आणि प्रत्येकी 30 हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दंड न भरल्यास एक वर्ष कारावास भोगावा लागेल. याशिवाय शस्त्रास्त्र कायद्यान्वये सात वर्षे कारावास आणि प्रत्येकी पाच वर्षांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष कारावास भोगावा लागेल.
अतिशय गंभीर कृत्य
दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलगी त्यांच्या नातेवाईकांसह 8 ऑक्टोबर 2019 रोजी विजयादशमी जत्रा पाहून घरी परतत होत्या. प्रतापगंज पोलीस ठाण्याच्या उत्तर चिलौनी येथील भैंगा धारजवळ काही तरुणांनी शस्त्राच्या जोरावर संपूर्ण कुटुंबाला रोखले. पुरुष सदस्यांचे हातपाय बांधून महिलांचे दागिने लुटून त्यांना बेदम मारहाण केली. एका महिलेवर चार जणांनी तर एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला. सामूहिक बलात्काराच्या वेळी एका महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यावर गुन्हेगारांनी गोळ्या झाडल्या. गोळी झाडल्यानंतर तिच्यावरही सर्वांनी बलात्कार केला. पाटण्यात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. तपासात सहा जणांची नावे पुढे आली.