इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही चोरी प्रकरणांमध्ये चोर काहीतरी पुरावा सोडतात, त्याचा मागवा घेत पोलीस चोरांना शोधून काढतात. परंतु काही वेळा चोर देखील हे पोलिसांपेक्षा वरचढ किंवा हुशार ठरतात, अशीच एक घटना कानपूर मध्ये घडली. आपल्या मित्राची हत्या करून चोरट्यांनी त्याचे सोने सोनाराला विकण्याऐवजी एका गोड लोन बँकेकडे तारण ठेवले आणि कर्जाची रक्कम घेतली त्यामुळे कोणालाही संशय आला नाही, मात्र अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
अन्य प्रकारच्या कर्जांच्या तुलनेत गोल्ड लोनचे नियम अतिशय सोपे आहेत. गोल्ड लोनसाठी अर्ज करण्यासाठी, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पॅन आवश्यक असेल. पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज बिल, टेलिफोन बिल किंवा इतर कागदपत्रे द्यावी लागतील. याशिवाय तुमची छायाचित्रेही द्यावी लागतील. पण तारण ठेवलेले सोने कुठून आणले? हे प्रश्न बँका किंवा गोल्ड लोन कंपन्या विचारत नाहीत. याचाच फायदा चोरट्यांनी घेतला.
या घटनेची अधिक माहिती अशी की, हुक्का पिण्याच्या वादातून गोविंद नावाच्या हॉटेल चालकाची त्याच्या सहा मित्रांनी हत्या केली. गोविंदने सोन्याची अंगठी आणि चेन घातली होती, ती मारेकऱ्यांनी लुटून नेली. मात्र त्याचे चोरटे मित्र अतिशय हुशार होते. गोविंदच्या मारेकऱ्यांपैकी एक असलेल्या आदित्यने लुटलेल्या सोन्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घेतली. कारण तो एका खासगी बँकेत रिकव्हरी एजंट आहे. त्यामुळेच त्यांनी लुटलेले सोने सराफाला विकण्याऐवजी गोल्ड लोन कंपनीकडे तारण ठेवण्याचा पर्याय आजमावला.त्यानुसार आरोपी आदित्यने गोविंदकडून लुटलेले सोने एका नामांकित गोल्ड लोन कंपनीकडे गहाण ठेवून 50 हजार रुपये घेतले.
गोविंदची हत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी विकास नगर येथील एका प्रसिद्ध गोल्ड लोन कंपनीच्या शाखेत पोहोचला. कंपनीतील कर्मचाऱ्याला सोन्याची अंगठी आणि चेन दाखवून कर्जासाठी अर्ज केला. ओळख म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्ड सबमिट केले. लुटलेले सोने घेण्यासाठी परत येण्याची गरज नाही हे दुष्ट आदित्यला माहीत होते, म्हणून त्याने केवळ 90 दिवसांसाठी वार्षिक 28 टक्के दराने सोने कर्ज घेतले.
सोन्याच्या दोन्ही तोळ्यांचे वजन 17.5 ग्रॅम होते. निव्वळ वजन 15.4 ग्रॅम निघाले. बाजारात एवढ्या सोन्याची किंमत किमान 80 हजार रुपये आली. त्याने ही रक्कम खासगी बँक खात्यात वर्ग करण्यात केली. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे 30 मिनिटे लागली. लूटलेले सोने गहाण ठेवून मिळालेले पैसे घेऊन आदित्य फरार झाला. मात्र या प्रकरणाचा अखेर पोलिसांना सुगावा लागला आणि त्यांनी आरोपीला अटक केली.
Crime Friend Murder Gold Theft Loan Police Investigation Uttar Pradesh Kanpur