इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राग किंवा संताप ही भयानक गोष्ट आहे, रागाच्या भरात अविचारी मनुष्य काय करेल, याचा नेम नसतो. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे अशीच एक भयानक घटना घडली. एका सावत्र बापाने रागाच्या भरात अगदी किरकोळ कारणावरून अकरा वर्षे बालकाला बेदम मारहाण करत त्याचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून या निर्दयी बापाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मथुरा शहरात पुष्प विहार कॉलनी प्रेमवीर आणि त्याची पत्नी नीलम हे राहतात, नीलमचा हा दुसरा विवाह आहे. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले असून तेही सध्या तिच्या सोबत राहतात. नीलमने प्रेमवीर सोबत प्रेम विवाह केल्यावर काही दिवस प्रेमात गेल्यावर घरात किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले.
प्रेमावीर हा त्याच्या सावत्र मुलांना मारहाण करू लागला, काल सकाळी नीलमचा मोठा मुलगा (वय ११ ) बाहेरून आला आणि बेडवर गेला. घाणेरडे पाय घेऊन बेडवर का चढला? असे म्हणत प्रेमवीर याने त्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे मारहाण करीत असताना मुलाची आई ही बाहेर गेली होती, तर लहान मुलगा (वय ७) तेथे होता, आपल्या भावाला वडील हे बेदम मारहाण करीत असल्याचे पाहून तो मुलगा भयभीत झाला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्या असता लहान मुलांने आपल्या जबानीत आपल्या पित्यानेच भावाला मारहाण करीत ठार केल्याचे सांगितले. या प्रकरणी प्रेमवीर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
Crime Father Murder Small Child due to This Reason