इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झाडातून देव प्रकट झाला, पाण्यातून देव प्रगट झाला, तसेच डोंगरातून मूर्ती निघाली जमिनीतून मूर्ती निघाली, असे सांगून भाविकांची फसवणूक करणारे की नाहीत. उत्तर प्रदेशातही असाच एक प्रकार घडला मूर्ती प्रगट झाल्याचा बनव करून लोकांची आर्थिक लूट करण्याचा काही जणांचा डाव होता. वास्तविक ही मूर्ती त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मागवली होती, आणि ती मूर्ती प्रगट शेतजमिनीतून प्रकट झाल्याचे त्यांनी बनाव रचला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथील महमूदपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने जमिनीतून पिवळ्या धातूची मूर्ती सापडल्याचा दावा केला. या प्रकरणी पोलिसंनी तीन जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे.
दरम्यान, भोळ्या लोकांकडून पैसे उकळण्यासाठी आरोपींनी अॅमेझॉनवरून मूर्ती मागवून हे नाटक रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
अप्पर पोलीस आयुक्त शशी शेखर सिंह यांनी सांगितले की, गावात राहणारे अशोक कुमार आणि त्यांचे दोन्ही मुलगे गेल्या दोन दिवसांपासून आपल्याला स्वप्नात देवाची मूर्ती सापडल्याचा दावा करत होते. त्यांच्या शेतात खोदकाम केले असता तिथे धातूच्या मूर्ती सापडल्याचा दावा केला. त्यानंतर या बापलेकांनी तिथे मंदिर बांधण्याची पुडू सोडली. या तिघांनीही ऑनलाईन मूर्ती मागवल्या. त्यानंतर त्या शेतात पुरून ठेवल्या. त्यानंतर हे भोळ्या भाबड्या लोकांमध्ये मूर्ती प्रकट झाल्याची बातमी पसरवू लागले. त्यामाध्यमातून या मंडळींनी हजारो रुपयांची दक्षिणाही मिळवली. या तिघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी पावले उचलली आहेत.
Crime Farm Land Idol Cheating Police Trap Investigation