इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षकांचे म्हणजेच गुरु व शिष्याचे नाते हे अत्यंत प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे असते परंतु पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका शाळेत शिक्षिकेने विद्यार्थिनीला काही मुद्द्यांवरून शिवीगाळ केली. त्याचा या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रचंड राग आला. त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी शाळेत घुसून महिला शिक्षिकेला विवस्त्र करून धक्काबुक्की व मारहाण केली. ही विद्यार्थिनी अल्पसंख्याक समाजातील असून याप्रकरणी पोलिसांनी 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिली हद्दीतील त्रिमोहिनी प्रताप चंद्र हायस्कूलमधील ही घटना आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला शिक्षिकेने विद्यार्थिनीला काही कारणावरून शिवीगाळ केली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी शाळा गाठून मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. दरम्यान, प्रकरण खूप वाढले आणि ते महिला शिक्षिकेच्या खोलीत पोहोचले आणि तिला शिवीगाळ करू लागले. यावेळी घरातील सदस्य आणि त्यांच्या साथीदारांनी महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा शाळेत पोहोचला आणि त्यांनी प्रकरण शांत केले.
स्थानिकांनी या घटनेवर आक्षेप घेत रास्ता रोको केला. यानंतर पोलिसांनी येथे येऊन गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. सदर विद्यार्थी हा एका विशिष्ट समुदायाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या युवा शाखेचे प्रदेश उपाध्यक्ष तरुणज्योती तिवारी यांनी सांगितले की, नववीतील विद्यार्थिनीने हिजाब परिधान केला होता. या प्रकारामुळे त्याला शिक्षकाने शिवीगाळ करून वर्गाबाहेर हाकलून दिले. या घटनेचा व्हिडिओही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Crime Family Members Beaten Women Teacher in School Molestation West Bengal South Dinajpur