लखनऊ, उत्तर प्रदेश (इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क) – कोणत्याही नातेवाईकांमध्ये प्रेमाचे आणि स्नेहाचे संबंध असले तर गोडवा असतो, परंतु काही वेळा अनेक कारणांमुळे वितुष्ठ येते आणि नातेवाईकांना मधील संबंध बिघडतात. त्यातून प्रसंगी मारहाण आणि कोर्टकचेरी सुरू होतात. उत्तर प्रदेशातील एका माजी खासदाराने आपल्या नातेवाईकांना तुरुंगातून दादागिरी सुरू केली असून धमकी देत त्यांना आपल्या मुले आणि भावाकडून मारहाण देखील केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अहमदाबाद तुरुंगातून फोन करून आपल्या एका नातेवाईकाकडून पाच कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप माजी खासदार अतिक अहमदवर आहे. तसेच मालमत्ता हडप आणि हत्येप्रकरणी करेली अतिकचा मुलगा अली याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. तसेच घटनास्थळावरून एक कार आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
माजी खासदार अतिक अहमद यांचे मेहुणे इम्रान यांचे कुटुंब चकिया येथे राहते. इम्रान व त्याचा भाऊ मोहम्मद झीशानने मालमत्तेचा व्यवहार करतात. त्याच वेळी अतिकची मुले अली, असद, कछोली, सैफ, इम्रान गुड्डू, अमन, संजय सिंग आणि इतर १५ जण त्यांच्या प्लॉटवर पोहोचले. तेथे अलीच्या साथीदारांनी इम्रानला घेरले आणि अतिकशी फोन बोलण्यास सांगितले. त्यानंतर फोन स्पीकर चालू केला आणि पलीकडून अतिक म्हणाला, ही संपत्ती माझ्या बायकोच्या नावावर कर, नाहीतर तुझे आणि तुझ्या भावाचे हातपाय तोडून टाकू. तसेच पाच कोटी रुपये बंगल्यात पोहोचवा. त्यानंतर त्या १५ गुंडांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. झीशानने साथीदारासह तेथून पळ काढला आणि तो थेट पोलीस ठाण्यात गेला.
गुंडांनी त्याच्या प्लॉटवर बांधलेली भिंत जेसीबीने पाडण्यास सुरुवात केली. काही वेळातच इन्स्पेक्टर यादव यांच्यासह अनेक पोलिस घटनास्थळी पोहोचले. तेथे पोलिसांना पाहताच अली त्याच्या साथीदारांसह पळून गेला मात्र सैफ आणि असद पकडले गेले असून त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले. तर अतिकचा मुलगा अलीच्या शोधासाठी दोनदा छापे टाकण्यात आले. वास्तविक पाहता अतिक अहमदसोबत त्याचे अनेक नातेवाईकही गुन्हेगारीच्या दुनियेत होते. खुद्द अतीकचा मेहुणा इम्रान हा देखील अतीक टोळीचा सक्रिय सदस्य होता. दोन वर्षांपूर्वी देवरिया कारागृहात प्रॉपर्टी डीलर झैदला मारहाण केल्याप्रकरणी अतिकसोबत इम्रानचेही नाव गोवले गेले होते. २५ हजारांच्या जामिन व जात मुचलक्यावर इम्रानची तुरुंगातून सुटका झाली होती.
देवरिया तुरुंगातील घटनेनंतर इम्रानच्या संपूर्ण कुटुंबाने अतीकपासून स्वतःला दूर ठेवले. मात्र त्यानंतरही ते फोन करून पैसे मागत होता. यापूर्वी अनेक वेळा खंडणीमुळे त्रासलेल्या इम्रानने जामिनावर सुटल्यापासून मोबाईल ठेवणे बंद केले तसेच प्रयागराज शहर ही सोडले. आता तो प्रॉपर्टीचा व्यवसाय सांभाळत आहे. त्यामुळे त्याला टार्गेट करून मारहाण करण्यात आली. दोन वर्षांपासून अतीकमुळे हे इम्रानचे सर्व कुटुंब त्रस्त आहे.