ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘काळा आला होता, पण वेळ आली नव्हती’, अशी मराठीत एक म्हण आहे. त्याचप्रमाणे ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशीही एक म्हण आहे या म्हणी सांगण्याचे कारण म्हणजे याचा प्रत्यय नुकताच मुंबईत घरकाम करणाऱ्या एका महिलेला आला आहे. मालाड-पश्चिम उपनगरात एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने एका महिलेला 20 व्या मजल्यावरील टेरेसवर नेले आणि तेथून तिला छतावरुन फेकून दिले. सुदैवाने ती 18 व्या मजल्यावरील बाल्कनीत अडकली, तसेच आश्चर्यकारकरित्या जिवंत बचावली आहे. या घटनेमुळे इमारतीत एकच दहशत पसरली आहे. तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून तिची सुखरूप सुटका केली.
याप्रकरणी फरार सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड वेस्ट ब्लू होरायझन टॉवरमध्ये २६ वर्षीय महिला काम करते. सकाळी काम आटोपून घरी जात असताना तेथे तैनात असलेला सुरक्षा रक्षक अर्जुन सिंग महिलेला भेटायला आला. त्याने पीडितेला विचारले एक महिला 20व्या मजल्यावरील ए विंगमध्ये राहायला आली आहे. तिला घरकामासाठी बाईची गरज आहे. ती एक दिवसासाठी 3 हजार रुपये देण्यास तयार आहे. व तिला घरमालकाने अर्ध्या तासानंतर येण्यास सांगितले आहे.
https://twitter.com/Khanmidday/status/1553347665286467585?s=20&t=rQOwYF1MsG9weoJoEq-ItA
महिलेच्या म्हणण्यानुसार, कपडे घेण्यासाठी टेरेसवर गेली असता अर्जुनने मागून येऊन तिचा गळा पकडला व तिला टेरेसवरून खाली फेकले आणि पळून गेला. येथे ती 18 व्या मजल्यावरील खिडकीच्या शेडमध्ये अडकली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मालाड पोलीस व अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत खिडकीतून महिलेची सुटका केली. महिलेच्या मानेला व डोक्याला व हाताला किरकोळ दुखापत झाली असून तिला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मालाड पोलीस सिक्युरिटी गार्ड अर्जुन सिंगवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आज त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत आरोपीचे म्हणणे आहे की, त्याचे या महिलेसोबत संबंध होते. त्यामुळे ती त्याला ब्लॅकमेल करून पैसे घेत होती. या प्रकाराला कंटाळून मी तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिलेने या गोष्टीला नकार दिला असून आरोपीशी कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचे सांगितले आहे. मालाड पश्चिम येथील सुंदर नगर परिसरातील ब्ल्यू होरायझन इमारतीमध्ये परिसरातील एका हाय प्रोफाईल इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने या महिलेचे प्राण वाचवले. सध्या तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी वॉचमनने महिलेला का ढकलले, याचा पोलिस शोध घेत आहेत.
Crime Domestic Women Worker Thrown from 20th Floor of Building
Mumbai Malad Police