इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विवाहित महिलांचा छ्ळ करण्याच्या घटना आपल्या देशात रोज घडतात, या संदर्भातील बातम्या प्रसार माध्यमांमध्ये नेहमीच दिसून येतात, हुंड्यासाठी आणि पैशासाठी महिलेचा पती, सासू, सासरे आणि अन्य सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येतो. या संदर्भात अत्यंत कठोर कायदा असतानाही या घटना गेल्या काही वर्षात वाढत आहेत. केवळ विवाहितेचा छळच करण्यात येत नाही, तर काही प्रकरणांमध्ये त्या महिलेची अमानुषपणे हत्या देखील करण्यात येते. अशा प्रकारची घटना नुकतीच उत्तर प्रदेशात
घडली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मुरादानगर येथील सिद्धार्थ विहार येथून बेपत्ता विवाहित महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. या हत्येतील आरोपी सासू, सासरा आणि पतीला अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून खुनात वापरलेली स्कूटी जप्त केली आहे. पतीला कानशिलात लगावल्यामुळेच सासूने सूनेची हत्या केली होती. याप्रकरणी पोलीसांनी सांगितले की, मुरादनगर येथे विवाहीता रिया हिचा गळा चिरून खून करण्यात आला. मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे शीर वेगळे करून नाल्यात टाकले होते. हत्येनंतर आरोपी पतीने पोलिसांना रियाचे अपहरणा झाल्याची खोटी माहिती दिली होती. पोलिसांनी रियाचा पती आकाश त्यागी, सासू उषा त्यागी आणि सासरे सुरेश त्यागी यांना अटक केली आहे.
मूळचे विद्या विहार येथील रहिवासी असून व सध्या सिद्धार्थ विहार येथील आकाश त्यागी याचे मध्य प्रदेशातील इंदूर येथील विजय नगर कॉलनीत राहणाऱ्या रिया जैन हिच्याशी २०१५ पासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनीही घरच्यांच्या इच्छेविरुद्ध गेल्या वर्षी मार्चमध्ये लग्न केले. मात्र आकाशचे नातेवाईक या लग्नावर खूश नव्हते. हुंड्यासाठी ते रियाचा छळ करत असत, तसेच आकाश हा रोज रियाशी भांडत असे. एके दिवशी भांडणाच्या वेळी रियाने पती व सासऱ्याला कानशिलात लगावली. त्याचदिवशी कुटुंबियांनी रियाच्या हत्येचा कट रचला. या कटानुसार तिची सासू उषा हीने सून रिया हिला घरातून एका ऑटोतून संजयनगर येथील वैद्यकीय तपासणी सेंटरमध्ये घेऊन गेली. येथे सासरे सुरेश आधीच हजर होते. त्यानंतर तिला गोड बोलून स्कूटीवर बसवून मुरादनगर येथे नेले. वाटेत सासूने रियाला जेवण करताना कोल्ड ड्रिंकमध्ये नशा आणणारा पदार्थ मिसळून प्यायला दिले. ती बेशुद्ध पडल्यावर तिला शहजादपूर गावात नेऊन धारदार शस्त्राने तिचा शिरच्छेद केला.
तिन्ही आरोपींनी रियाचा मृतदेह उसाच्या शेतात आणि कापलेले डोके गंगनार नाल्यामध्ये फेकून दिले. रियाच्या हत्येनंतर सुरेश आणि उषा घरी परतल्यावर आकाशने फोन करून पोलीसांना पत्नी रियाच्या अपहरणाची खोटी माहिती दिली. आकाशने पोलिसांना सांगितले की, रिया तिची आई उषा हिच्यासोबत बाजारात जात होती, तेव्हा कारमधून आलेल्या चोरट्यांनी तिचे अपहरण केले. तसेच रियाचा भाऊ राहुल येथून काही जणांकडून पैसे उसने घेऊन मध्य प्रदेशात पळून गेला आहे. पैसे परत करण्यासाठी राहुलवर दबाव टाकण्यासाठी गुंड व सावकारांनी त्याच्या बहिणीचे अपहरण केले. मात्र सुरुवातीला संशय बळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची कडक चौकशी केली. तसेच संशयित आरोपी पोलीस तुटून पडल्याने त्यांनी अखेर पोलिसांसमोर सत्य कबूल केले.