इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – समाजात रोजच वेगवेगळ्या बऱ्या-वाईट घटना घडत असतात, त्यातच गुन्हेगारी संदर्भात काही घटना माणसाचे मन विदिर्ण करतात, गुन्हेगार जेव्हा एखादा गुन्हा करतो तेव्हा कदाचित तो त्याचा मेंदू वापरतच नसावा किंवा त्याला मन किंवा हृदय नसावे असे म्हटले जाते. काही घटनांमध्ये याचा प्रत्यय येतो, दिल्लीमध्ये देखील असाच एक अमानुष प्रकार घडला, एका गुन्हेगारांनी एका व्यक्तीचा खून करून काही अवयव रस्त्यावर टाकून दिले, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी देखील असाच प्रकार घडला, यामुळे पोलिस देखील चक्रावून गेले.
पूर्व दिल्लीतील पांडव नगर येथील रामलीला मैदानावर सलग तिसऱ्या दिवशी मृतदेहाचे अवशेष सापडले. सोमवारी दोन्ही पाय पिशवीत टाकून चार तुकडे केले. मंगळवारी सायंकाळी डोके बाहेर टाकण्यात आले. बुधवारी सकाळी दोन्ही हात बाहेर टाकण्यात आले. सापडलेल्या मृतदेहाचे डोके अतिशय थंड होते. कारण ते काही वेळापूर्वी डीप फ्रीझरमधून बाहेर फेकल्यासारखे दिसत होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मारेकऱ्याने मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजरमध्ये ठेवल्याचे दिसते. दररोज एकेक तुकड्याची विल्हेवाट लावून तो पोलिसांना आव्हान देत आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेहाची स्थिती पाहता हा मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा, हे ओळखणे कठीण आहे. पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष शवागारात सुरक्षित ठेवले आहेत.
या घटनेच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. सोमवारी पांडव नगर परिसरातील चांद सिनेमाजवळील झुडपातून एक पिशवी सापडली. त्याचे दोन पाय चार तुकडे होते. दुसऱ्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता हे शीर सापडले. काल बुधवारी मृतदेहाचे दोन्ही हात सापडले. लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्याचा दावा पोलिस करत आहेत.