इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात रिक्षा किंवा साध्या टॅक्सी ऐवजी कुल कॅब प्रवासासाठी सोयीची मानली जाते साहजिकच कुल कॅब वापरण्याचे प्रकार वाढले आहे, परंतु एका कुल कॅब चालकाने प्रवासात किरकोळ वाद झाल्याने रागातून त्याची हत्या केल्याने या घटनेबद्दल खळबळ उडाली आहे. दरम्यान केलंबक्कम पोलिसांनी कॅब ड्रायव्हरला अटक केली. अटक आरोपीचे नाव रवी (४१) आहे.
मृत व्यक्तीचे नाव एच. उमेंदर असे आहे. तो कोईम्बतूर येथील एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता आणि नुकताच तो शहरात आला होता. तो आणि त्याचे कुटुंब गुडुवनचेरी येथे एका नातेवाईकाच्या घरी राहिले. ते पत्नी भव्या आणि बहिणीच्या कुटुंबासोबत नवलूर येथील राजीव गांधी सलाई येथील मॉलमध्ये गेले होते. ते गुडुवनचेरी येथे परतत असताना उमेंदरने परत येताना कॅब बुक केली. ठरलेल्या वेळेनुसार कॅबही पोहोचली. मात्र, कॅब चालकाला ओटीपी सांगण्यापूर्वीच मुले गाडीत जाऊन बसली. यामुळे चालकाला राग आला आणि सात जणांच्या कुटुंबासाठी मोठे वाहन बुक करावे लागेल असे चालकाने सांगितले.
त्यानंतर उमेंदर त्याचा मोबाईल शोधत होता. नंबर शेअर करण्यात थोडा विलंब झाला. यामुळे चिडलेल्या चालकाचा त्याच्या प्रवाशाशी वाद झाला. ड्रायव्हरने ओटीपी शेअर न केल्यास वाहनातून खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा मोठा आवाज करत दार बंद करून उमेंदर गाडीतून खाली उतरला. चालकाने त्याला आणखी शिवीगाळ केली. यावेळी उमेंदरने ड्रायव्हरला मारले. त्यानंतर रवीने कारमधून खाली उतरून उमेंदरच्या तोंडावर ठोसा मारला. त्याला खालीही ढकलले
उमेंदरच्या कुटुंबीयांनीही चालकाला बेदम मारहाण केली. दरम्यान, उमेंदर बेशुद्ध पडला आणि त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, चेहऱ्यावर मारहाण केल्याने त्याच्या नाकातून रक्त निघाले. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी कॅब चालकाला अटक केली आहे.
crime Cab driver Killed passenger Murder arrest police