नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधाराश्रमातील बालिकांच्या लैंगिक शोषण प्रकरणी संशयित आरोपी हर्षल मोरेच्या चौकशीसाठी आता पोलिस आक्रमक झाले आहेत. आतापर्यंत तो चौकशीत फारसे सहकार्य करीत नसल्यानेच नाशिक पोलिसांनी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. पोलिसांनी आता दोन पथक तयार केले असून एक पथक मोरेची इन कॅमेरा चौकशी करीत आहे. तर, दुसरे पथक मोरेच्या सटाणा येथील घरी तपासासाठी रवाना झाले आहे.
हर्षल मोरेवर आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वतंत्र समितीकडून याबाबतचा अहवाल गृहविभागास पाठविला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही कामाला लागली आहे. म्हसरूळ येथील ज्ञानदिप गुरूकुल आश्रम आणि सटाणा येथील मुळ गावी संशयितास नेण्यात येवून पंचनामा आणि तपास इन कॅमेरा केला जात आहे.
द किंग फाऊंडेशन संचलित ज्ञानदिप गुरूकुल आश्रमात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला. २०१८ ते २३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संस्थापक हर्षल बाळासाहेब मोरे यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने मंगळवार (दि. ६) पर्यंत त्याच्या कोठडीत वाढ केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि.२) सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांनी पथकासहित आश्रमात पुन्हा कसून तपास केला.
यावेळी संशयितालाही तिथे नेत सर्व माहिती संकलित करण्यात आली. तर, जबाब नोंदणीसह तपासाकामे इन कॅमेरा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी हा आश्रम सील केला असून, विद्यािर्थनींना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. तर उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या आदेशान्वये पोलिसांचे एक पथक सटाणा येथील मोरेच्या घरात चौकशी व तपासाकरीता रवाना झाले आहे. याबरोबरच द किंग फाउंडेशनच्या विश्वस्तांचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, विश्वस्त पदाचा कारभार सांभाळतांना संशयित मोरेच्या गैरकृत्याबद्दल कल्पना होती का, याचा तपास केला जात आहे.
Crime Adharashram Rape Case Harshal More Investigation
Nashik City Police Molestation