इंडिया दर्पण ऑलाईन डेस्क
मी फक्त हिंदीतच बोलणार म्हणणा-या रिक्षाचालकाला शिवसेना ठाकरे गट व मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. विरार रेल्वे स्थानकाबाहेर ही घटना घडली. राजू पटवा असे या मुजोर रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्या सोबत वाद झालेला अस्सल मराठीत बोलणारा व्यक्ती भावेश पडोलीया हा स्वत: परप्रांतीय उत्तर प्रदेश, झाशी येथील असून महाराष्टाला आपली कर्मभूमी मानणारा आहे.
दोन दिवसांपूर्वी विरारमध्ये मुजोर परप्रांतीय या रिक्षाचालकाने एका दुचाकीस्वाराला दमदाटी केली होती. त्यानंतर मराठीद्वेष्ट्या रिक्षाचालकाला मनसे व शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला. विशेष म्हजे ज्या भावेश पडोलीया आणि त्याच्या बहिणीला धक्का बुक्की केली होती. त्यांची माफी मागायला लावली.
दरम्यान पालघर जिल्हा पोलिसांनी अद्याप अधिकृत गुन्हा दाकख केलेला नाही. आम्ही व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे. वस्तुस्थिती पडताळत आहोत. दोन्ही पक्षांकडून तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले.