इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढ झाली आहे. खून, दरोडे, बलात्कार, विनयभंग, हाणामारी यासारखे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर पोलिसांकडून गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
नालंदा जिल्ह्यातील बेन हद्दीतील एका गावात आठ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात आहे. घटनेबाबत पोलीसांनी असे म्हटले आहे की, एक मुलगी कुरकुरे आणण्यासाठी दुकानात जात होती. त्यानंतर वाटेत आरोपी किशोरने त्या निष्पाप मुलीला फूस लावून आपल्यासोबत शेतात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. तिला रक्तस्त्राव झाल्याने मुलगी आरडाओरडा करू लागली, त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला.
कसेबसे घरी पोहोचल्यानंतर मुलीने सर्व प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला, त्यानंतर कुटुंबीय रक्तबंबाळ अवस्थेत मुलीला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली. तेथे पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
पोलीस अधिकारी म्हणाले की, आरोपीने तिला आमिष दाखवून पळवून नेले व त्याच्याशी गैरवर्तन केले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.