इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक गंभीर गुन्हा घडला आहे. खेवराजपूरमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल पाच जणांच्या हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हत्याकांडात जिवंत राहिलेल्या एकुलत्या एका तरूणामुळे या सर्व गुन्ह्याचा खुलासा झाला आहे. त्याने सांगितले की, सासरच्याच एका तरुणाचे त्याच्या पत्नीशी जवळचे संबंध होते. प्रतिकार केल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानेच हा गुन्हा केल्याचा त्याचा संशय आहे.
या घटनेबाबत पोलीस अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत, मात्र तरूणाने सांगितले की, त्याची मौमा येथे सासरवाडी आहे. पत्नीच्या नातेवाईकांपैकी एक तरुण तिच्या घरी वारंवार येत असे. त्यांच्यामध्ये खूप दिवसांपासून प्रेम कहाणी सुरू होती. तसेच तो माझ्या पत्नीला वारंवार त्रास देत असे. सहा महिन्यांपूर्वी मला याबाबत समजल्यानंतर मी विरोध केला.
पत्नीचा मोबाईल हिसकावून घेऊन गेलो. घरात फक्त वडिलांचाच मोबाईल होता. मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर एक दिवस हा तरुण पत्नीला भेटायला आला. त्या दिवशी संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नीला त्या तरुणापासून दूर केल्यानेच हे हत्याकांड घडल्याचे सांगितले जात आहे. घरात कोण कुठं झोपलंय हे त्याला माहीत होते. मात्र, आपल्या कुटुंबातील पाच जणांच्या हत्येप्रकरणी तक्रार दिली असता त्याने कुणावरही आरोप केलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, एका मिरवणुकीतील काही जण त्याच्या घरी पाणी पिण्यासाठी आल्याची माहिती मिळाली आहे. हातपंपाचे पाणी प्यायल्यानंतर. रात्री त्याच नागरिकांनी हा गुन्हा केल्याचा संशय आहे. मिरवणुकीतील काही जणांनी त्या घरातील कुटुंबातील पाहून कट रचल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.