इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नवी दिल्ली नजिक गाजियाबाद परिसरात काही गुंड प्रवृत्तीच्या ८ तरुणांनी दोन सख्ख्या भावांना चोरीच्या कारणावरून एका घरात डांबून त्यांच्यावर अत्याचार केले, इतकेच नव्हे तर त्यांना नग्न करून चामडी बेल्टने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून याप्रकरणी मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अली प्रेम गार्डनमध्ये चोरीच्या संशयावरून दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींच्या घाणेरड्या कृत्याचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सात-आठ जणांनी दोन्ही तरुणांना विवस्त्र करून खोलीत कोंडून बेदम मारहाण करीत, पण तरुणाच्या गुप्तांगात बाटलीही टाकली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीलाही अटक केली आहे.
बागपत येथे राहणारे दोन तरुण पळसौंडा येथील अली प्रेम गार्डनमध्ये बिल्डिंग मटेरियलचे दुकानदार असिफ यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचे. नोकरी सोडल्यानंतर दोघेही गावातच भाड्याच्या खोलीत राहत होते. तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितले की, आसिफने दोन्ही भावांना नोकरी देण्यासाठी बोलावले होते. यानंतर दोन्ही भावांसोबतच्या क्रूरतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडिओमध्ये आसिफ, शकील, रिजवान आणि इतर तरुण दोघा भावांना एका खोलीत बंद करून, त्यांना नग्न करताना आणि बेल्टने बेदम मारहाण करताना दिसत होते.
अनेकवेळा बेल्टने गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये दोन्ही भाऊ आरोपींची माफी मागत आहेत मात्र सर्व गुंड त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर आरोपीने एका भावाच्या गुप्तांगात बाटलीही टाकली, त्यानंतर तो जोरजोरात ओरडताना दिसत आहे. या तरूणाच्या भावाने या प्रकरणातील मुख्य आरोपी शकील, रिझवान आणि आसिफ यांची नावे घेऊन एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेऊन त्वरीत कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी आसिफला अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. चोरीच्या संशयावरून ही घटना केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.