संचारबंदीत दुचाकीवरुन टोळक्याने फिरणे पडले महागात, गुन्हा दाखल
नाशिक : शहरात जमाव आणि संचारबंदी लागू असतांना पाच दुचाकीवरील १४ ते १५ जणांच्या टोळक्याने धुडघूस घातल्याची घटना नाशिक पुणे रोडवर घडली. याप्रकरणी साथरोग प्रतिबंध अधिनियम आणि विविध निर्बंधाचे उलंघन केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि १४) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नाशिक पुणे मार्गावरून पाच दुचाकीवर प्रवास करणा-या टोळक्याने हे कृत्य केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असतांना टोळक्याने सोशल डिस्टन्सींगचे तसेच दळण वळण साधणांसाठी असलेल्या निर्बंधांचे उल्लघन करून रस्त्याने आरडा ओरड करीत प्रवास केला. शहरात संचारबंदी लागू असतांनाही एकत्रीत येत टोळक्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उंलघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मुन्तोडे करीत आहेत.
………
बेकायदा मद्यविक्री करणा-यास अटक
नाशिक : सिडकोतील मोरवाडी गावात बेकायदा मद्यविक्री करणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीताच्या ताब्यातून देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
सचिन उर्फ गणेश कचरू सोनवणे (रा.शांती भवनच्या समोर,मोरवाडी गाव) असे संशयीत मद्यविक्रेत्याचे नाव आहे. मोरवाडी गावात संचारबंदीतही बेकायदा मद्याची विक्री होत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकास मिळाली होती. बुधवारी (दि.१४) दुपारी पोलीसांनी छापा टाकला असता संशयीत दत्त मंदिरा समोरील सोनवणे यांच्या घरात देशी दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या १८० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी युनिटचे कर्मचारी नंदकुमार नांदुरीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गारले करीत आहेत.