इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जवळपास १०० तरुणांनी घरात घुसून २४ वर्षीय डॉक्टर तरुणीचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी मुलीच्या घराबाहेर धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली. तसंच तरुणीच्या वडिलांनाही बेदम मारहाण केली.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपहरण करण्यात आलेली तरुणीचं नाव वैशाली असून, ती डॉक्टर आहे. वैशालीचा साखरपुडा ठरला होता. साखरपुडा होण्याआधीच शुक्रवारी हा सर्व प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, आरोपींना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीसांकडून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचं सांगितलं आहे. “घटनेची चौकशी करण्यासाठी आम्ही पथकं विभागली असून सर्व बाजू तपासत आहोत. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून आम्ही सर्व परीने प्रयत्न करत आहोत. आम्ही पीडित कुटुंबाकडून सर्व माहिती घेतली असून सध्या त्यानुसार तपास सुरु आहे,” अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त सुधीर बाबू यांनी दिली आहे.
वैशालीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १०० तरुण घरात घुसले आणि घरात तोडफोड करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी मुलीचं अपहरण केलं. वैशालीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार “मुलीवर जबरदस्ती करत तिला घराबाहेर ओढत नेलं आणि कारमध्ये बसवून घेऊन गेले. पोलिसांनी काहीच केलं नाही. माझ्या मुलीचं अपहरण करण्यात आलं असून, हे पाप आहे. ते माझ्या मुलीसोबत काय करतील? हा अन्याय आहे“, असे म्हणणे त्यांनी मांडले आहे.
https://twitter.com/ANI/status/1601407392570232832?s=20&t=nYnVlHrQgAl-E2SwWzpiHA
Crime 100 Youths Kidnapped Young Girl Police