नाशिक : विकेएण्ड दरम्यान सायकलवरून विनापरवाना मद्यवाहतूक करणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीतांच्या ताब्यातून बेकायदा दारू साठ्यासह सायकल असा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिव्यामोहन सुनिल राज (२१ रा.आयटीआय कॉलनी,श्रमिकनगर) व हेमंत उर्फ राहूल नितीन थोरात (२१ रा.विराज पार्क धर्माजी कॉलनी,शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत गेल्या शनिवार – रविवार दरम्यान विकेएण्ड पाळण्यात आला. या काळात शहरातील सर्वच अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. सर्व दुकाने बंद असतांना संशयीत ध्रुवनगर येथील मेट्रोबार समोरील रोडवरून सायकलवर विनापरवानगी मद्यवाहतूक करतांना मिळून आले. मॅकडॉल नं.१ या विदेशी दारूच्या ४८ बाटल्या आणि सायकल असा सुमारे ३ हजार ६२० रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक महाले करीत आहेत.