नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंह यांना अनुसूचित जातीविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी हरियाणातील हिसार पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्याची लगेचच सुटका करण्यात आली.
गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर रोहित शर्माशी झालेल्या गप्पांमध्ये युवराजने युजवेंद्र चहलबद्दल जातीयवादी टिप्पणी केली होती. याबाबत हांसी, हिसार येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. युवराज सिंगला शनिवारीच अटक करण्यात आली होती, परंतु या संदर्भातली माहिती आज सोमवारी समोर आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार युवराज हिसारमधील पोलीस अधिकाऱ्यांसमोर तपासासाठी हजर झाले. मात्र अटक केल्यानंतर त्याची अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली. युवराज सिंगविरोधात एससी एसटी कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
आहे.
युवराज सिंग ओपनर रोहित शर्मासोबत इंस्टाग्राम लाइव्ह चॅट सेशनवर बोलत होता. या दरम्यान, दोघेही युजवेंद्र चहलबद्दल बोलत होते, जेव्हा युवराजने कथित जातियवादी शब्द वापरला होता. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात युवराज जातीयवादी भाष्य करताना दिसत आहे. या प्रकरणी हिसार, हांसी येथे दलित हक्क कार्यकर्ते आणि वकील रजत कलसन यांनी युवराजविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. कालसनने युवराजच्या अटकेची मागणी केली होती.