मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. विराट या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे. आयपीएल २०२३ मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोहलीने ५५ धावांची शानदार खेळी खेळली आणि या स्पर्धेत त्याने ७००० धावाही पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराटनंतर शिखर धवनचे नाव येते, ज्याने आतापर्यंत ६५३६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा यांनीही आयपीएलमध्ये ६००० हून अधिक धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये ५० अर्धशतकं झळकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ५० वे अर्धशतक झळकावले. या बाबतीत केवळ डेव्हिड वॉर्नर त्याच्या पुढे आहे, ज्याने ५९ अर्धशतके झळकावली आहेत. या स्पर्धेत ५० हून अधिक धावा करण्यातही कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये ६३ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तर कोहलीने ५५ वेळा अशी कामगिरी केली आहे.
आयपीएल रेकॉर्ड
विराट कोहलीने आयपीएलमध्ये २०० हून अधिक सामने खेळले आहेत आणि ७००० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याची सर्वात मोठी धावसंख्या ११३ धावांची आहे. त्याचा स्ट्राइक रेट १३० च्या जवळ आहे आणि सरासरी ३६ पेक्षा जास्त आहे. या स्पर्धेत त्याने ५० अर्धशतके आणि पाच शतके झळकावली आहेत.
या सामन्यात विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपल्या १००० धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध १००० हून अधिक धावा करणारा कोहली हा पाचवा फलंदाज आहे. या प्रकरणातही डेव्हिड वॉर्नर आघाडीवर असून त्याने कोलकाताविरुद्ध १०७५ धावा केल्या होत्या. त्याचवेळी शिखर धवनने चेन्नईविरुद्ध १०५७ धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने कोलकाताविरुद्ध १०४० धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरनेही पंजाबविरुद्ध १००५ धावा केल्या आहेत. आता या यादीत कोहलीच्या नावाचाही समावेश झाला आहे.
https://twitter.com/IPL/status/1654850879626022917?s=20
Cricketer Virat Kohli World Record in IPL