मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेट हा बहुतांश भारतीय नागरिकांचा आवडता खेळ आहे, साहजिकच या खेळातील जुने असो की नवे खेळाडू कसे खेळतात ? आणि त्यांच्या एकूणच जीवनशैली विषयी वक्तव्य विषयी सर्वांनाच उत्सुकता असते, आणि त्याची चर्चा देखील होते. सध्या देखील क्रिकेटमधील आजी-माजी खेळाडूंच्या एकूणच वक्तव्याविषयी आणि एकमेकांवरील टिपणी विषयी चर्चा सुरू आहे.
एकेकाळी क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या कपिल देव यांनी क्रिकेटचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या संदर्भात एक वक्तव्य केले, मात्र सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांनी या वक्तव्याचे खंडन करीत विराट कोहलीची बाजू घेतली आहे. विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी इंग्लंडविरुद्धच्या अंतिम T20 सामन्यातही कायम राहिली. यामुळे तो चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता. असं असूनही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माजी कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीच्या नावाबाबत केलेल्या टिप्पणीशी असहमतता दर्शवली होती.
या संदर्भात कर्णधार रोहित म्हणाला की, कपिलदेव बाहेरून खेळ पाहत आहे आणि आत काय चालले आहे ते कळत नाही. तर दुसरीकडे विराटच्या खराब कामगिरीने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचा भडका उडाला होता. हा विराट कोहली पाच महिन्यानंतर तरी चांगली कामगिरी करेल अशी आशा होती. मात्र, पुन्हा ‘जैसे थे’ हीच परिस्थिती दिसून आली.
गेल्या 3 वर्षात विराट कोहली कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. ही या अनुभवी खेळाडूसाठी धोक्याची घंटा आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, ‘प्रत्येकजण जेव्हा फॉर्ममध्ये येतो तेव्हा चढ-उताराचा सामना करावा लागतो. खेळाडूच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. त्यामुळे आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेव्हा एखादा खेळाडू इतकी वर्षे चांगली कामगिरी करत असतो, तेव्हा एक गोष्ट. किंवा दोन वाईट मालिकांमुळे तो वाईट खेळाडू बनत नाही. आपण त्याच्या भूतकाळातील कामगिरीकडे दुर्लक्ष करू नये. आम्ही जे संघात आहोत त्यांना खेळाडूचे महत्त्व माहित आहे. आमची स्वतःची विचार प्रक्रिया आहे. आम्ही आमचा संघ बनवतो आणि त्यामागे खूप विचार आहे.
क्रिकेट जगतातील एक दिग्गज नाव म्हणजे कपिल देव. उत्कृष्ट फलंदाजी सोबत गोलंदाजी मध्ये देखील अव्वल असलेले कपिल देव हे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली दैदिप्यमान विजय मिळवला होता. भारतीय संघाने जिंकलेला हा प्रथम विश्वचषक एखादी गोष्ट मिळवायची असेल तर योग्य नेतृत्वाची गरज असते, आणि ते नेतृत्व कपिल देव यांच्या रूपाने भारतीय संघाला मिळाले होते.
विराट कोहली हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार राहीला आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इएसपीएनच्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या एका यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाचा एकदिवसीय आणि टी -20 सलामीवीर फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. याशिवाय रोहित शर्मा कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी म्हणून ओळखला जातो. अंबानी समूहाच्या मुंबई इंडियन्सचा तो कर्णधारही आहे. रोहित जगातील एकमेव खेळाडू आहे ज्याने वनडेमध्ये दुहेरी शतके ठोकली आहेत.
भारतीय क्रिकेटच्या क्षेत्रात तिन्ही खेळाडू हे आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत जागतिक क्रिकेटमधील विराट कोहली हा मागील काही काळापासून खराब फॉर्मने ग्रासला असल्याने त्याच्यावर टीका होत आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही याबाबत बोलताना त्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विराट कोहली खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याला संघात घेऊन चांगल्या फॉर्ममधील युवा खेळाडूंना बाहेर बसवणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आले नाही. कोहलीने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा टी-20 सामना श्रीलंकाविरुद्ध यावर्षी फेब्रुवारीमध्ये खेळला होता. त्यानंतर आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. तसेच आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या.
दरम्यान, आयसीसीने नुकतीच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजाच्या क्रमावारीच्या टॉप-10 मधून विराट कोहली बाहेर पडलाय. तब्बल सहा वर्षानंतर विराट कोहली टॉ-10 मधून बाहेर पडलाय. इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यातही तो मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरला. परिणामी, आयसीसी कसोटी क्रमवारीत त्याची तीन स्थानांनी घसरण झाली असून तो सध्या 13 व्या स्थानावर पोहचलाय.
माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी विराटवर टीका केली होती. मात्र, यावरुन विराटचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी कोहलीचा बचाव केला आहे. शर्मा यांच्यासह विराट कोहलीचे फॅन्स देखील कपिल देव यांच्यावर भडकले आहेत.
राजकुमार शर्मा यांनी कोहलीला पाठिंबा दिला आहे. कपिल देव यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके ठोकणे ही काय साधारण गोष्ट नसल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
Cricketer Virat Kohli Perfromance Indian Team Expert Says Cricket BCCI Rohit Sharma Kapil Dev