इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड मधील कलाकार असो की प्रसिद्ध खेळाडू यांच्याकडे प्रचंड पैसा असतो. सहाजिकच या पैशाचे काय करावे ? असा प्रश्न त्यांना पडू शकतो. त्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये पैशाची गुंतवणूक करतात.
अनेक क्रिकेटपटू यांनी हॉटेल व्यवसायामध्ये पैसे गुंतविले आहेत. तर काही कलाकारांनी वेगवेगळ्या उद्योग-व्यवसाय मध्ये गुंतवणूक केलेली आढळते. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी देखील अशीच आगळीवेगळी गुंतवणूक केलेली आहे.
क्रिकेटपटू विराट कोहलीने दिल्लीस्थित एफएमजीसी कंपनी रेज कॉफीमध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी पॅकेज्ड कॉफी उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री करते. यासोबतच कॉफीच्या या रेंजसोबत झालेल्या डीलनुसार विराट कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडरही असेल.
खरे म्हणजे विराट कोहलीने केलेली ही पहिली गुंतवणूक नाही. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये विराटने पत्नी अनुष्का शर्मासोबत ब्ल्यू ट्राइब फूड नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली होती, त्यात घरी उगवलेल्या वनस्पतींपासून मांस तयार होते. याआधी फेब्रुवारी 2020 मध्ये विराट आणि अनुष्का यांनी कॅनेडियन अब्जाधीश प्रेम वत्साच्या विमा स्टार्टअप डिजिट इन्शुरन्समध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये 2.2 कोटींची गुंतवणूक केली होती, तर दोघांचीही आधीच वेलनेस स्टार्टअप Hyperis मध्ये भागीदारी आहे.
दुसरीकडे, विराटसोबतच्या सहकार्यामुळे बाजारात ब्रँडला चालना मिळेल आणि ग्राहक रेज कॉफीचे उत्पादन खरेदी करण्यास प्राधान्य देतील, अशी आशा रेज कॉफीला आहे. अर्थात आता नव्हे तर आगामी काळातच यासंदर्भात अधिक काही सांगता येऊ शकते.
विराट कोहलीने जागतिक क्रिकेटच्या सर्वोच्च क्षेत्रात काही अतुलनीय विक्रम प्रस्थापित केले आहेत आणि तो जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो, असे रेंज कॉफीचे संस्थापक आणि सीईओ भरत सेठी म्हणाले.