इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेटपटू विराट कोहली एका व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या एका व्हिडिओने वाद पेटला आहे. मुख्य म्हणजे हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहचले आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये विराट कोहली स्टेडियमबाबत भाष्य करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच प्रकरण आता थेट न्यायालयात पोहोचले आहे. उत्तराखंड न्यायालयाने या प्रकरणात दखल देत केंद्र सरकार आणि उत्तराखंड सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, विराट कोहली स्टेडियमच्या दुरावस्थेबद्दल चर्चा करताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस मैदानांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना आणि लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाही. मैदाने नसल्याने लहान मुलांना गल्लीत खेळावे लागते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड न्यायालयाने येत्या २ आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती राकेश थापलियाल यांच्या खंडपीठाने उत्तराखंडचे क्रीडा सचिव,भारत सरकारचे नगर विकास सचिव आणि युवा व्यवहार आणि क्रीडा सचिव नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची सुनवाई येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
असे आहे न्यायालयाचे मत
शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने मानसिक विकास वेगाने होतो. मात्र ज्यावेळी त्यांना फिट राहण्यासाठीच्या सोयीसुविधा मिळत नाहीत त्यावेळी ते आपला वेळ मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये वाया घालवतात. हेच कारण आहे की, त्यांचा शारिरीक आणि मानसिक विकास होण्यास उशीर होतो. मैदान असणं हे अतिशय महत्वाचे आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
Cricketer Virat Kohli Controversy Uttarakhand High Court Case