इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
शुभमन गिलची यशोकामगिरी
नव्या दमाचे तरूण खेळाडू भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतांना चमकले, की मग सहाजिकपणे क्रिकेट चाहत्यांना एक वेगळी अनुभूती मिळाल्याशिवाय रहात नाही. ज्यांना भविष्याचा विचार करायची सवय आहे त्यांना भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित असल्याची जाणिव करून देणाऱ्या या घटना असतात. काही दिवसांपुर्वीच हा आनंद इशान किशन याने दिल्यानंतर लगोलग शुभमन गिलने देखील आपल्या दिमाखदार खेळीतून या आनंदाची पुनरावृत्ती केल्याने भारतीय संघाचे तारूण्य आणखी शोभून दिसायला लागले आहे. यासंदर्भात सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…..
हल्ली क्रिकेट मधली स्पर्धा इतक्या उच्चस्तरावर वाढली आहे की, त्यावर विचार करायला संधी सुद्धा मिळत नाही. न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात हैद्राबादला शुभमन गिलने तडाखेबंद २०८ धावा केल्यानंतर भारतीय चाहते सुखावले होते. परंतु त्यानंतर पुढच्याच काही तासाभरात न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलने अशी काही दिमाखदार खेळी केली की, शुभमनची खेळी विस्मरणात जाते की काय आणि ३५० धावांचा डोंगर पार करून न्यूझीलंड विजयी होतो की काय? असे वाटायला लागले होते. अशा या अतिस्पर्धात्मक क्रिकेटमध्ये शुभमन सारख्या क्रिकेटपटूचा सुरू झालेला हा प्रवास आनंददायी आहे.
वडील पाठीशी असले की लिओनेल मेस्सी सारखा मुलगा पुढे जगज्जेता खेळाडू निर्माण होवू शकतो ही यशोगाथा आपण वाचली असेल. शुभमन गिलच्या बाबतीतही तेच घडलंय. त्याचे वडील लखविंदर सिंग हे मुळचे शेतकरी. पंजाबच्या फाझिकका जिल्ह्यातील जलालाबाद तालुक्याच्या चकखेरेवाला या छोट्याशा गावात त्यांची शेती. वडिलांना क्रिकेट आवडायचं. त्यांना क्रिकेटपटू देखील व्हायचं होतं. परंतु, ते शक्य झालं नाही आणि मग अवघ्या तीन वर्षाच्या शुभमनला लागलेली बॅट आणि बॉलची गोडी बघून त्यांना स्वतःचे अपुर्ण राहिलेले स्वप्न शुभमनमध्ये दिसायला लागले. क्रिकेटच्या वेडात मोठा होत चाललेल्या शुभमनसाठी त्यांनी स्वतःच्या शेतात एक मैदान आखलं आणि त्यात टर्फ विकेट सुद्धा बसवली. शुभमनसोबत खेळायला खेळाडू हवेत म्हणून त्याचे वडील गावातल्या मुलांना आमिष दाखवून बोलवायचे. जो शुभमनची विकेट घेईल त्याला १०० रूपयांचे बक्षिस सुद्धा द्यायचे. शुभमनसाठी प्रोफेशनल क्रिकेटर होण्याची ही पहिली पायरी ठरली.
.@ShubmanGill finishes things off in style! #TeamIndia complete a comprehensive 8️⃣-wicket victory in Raipur and clinch the #INDvNZ ODI series 2️⃣-0️⃣ with more game to go ??
Scorecard ▶️ https://t.co/tdhWDoSwrZ @mastercardindia pic.twitter.com/QXY20LWlyw
— BCCI (@BCCI) January 21, 2023
शुभमनचे वडील इतक्यावर थांबले नाहीत. गावाकडे शुभमनला योग्य कोचिंग मिळणार नाही हे लक्षात घेवून त्यांनी गाव सोडलं आणि मोहालीच्या पीसीए मैदानाजवळ भाड्याने घर घेवून तिथे कुटूंबाचं बिऱ्हाड हलवलं. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट अॅकेडमीत शुभमनला प्रवेश घेवून दिला आणि मग भारतीय संघात प्रवेश मिळविण्यापर्यंतची पुढची सगळी कथा शुभमनने त्याच्या हाताने लिहिली.
१६ वर्षाखालील विजय मर्चन्ट ट्रॅाफीत शुभमनने डबल सेंचुरी मारली आणि त्याचवेळी १६ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत वैयक्तिक ३५१ धावांची मोठी खेळी उभारतांना निर्मलसिंग या खेळाडूसोबत ५८७ धावांची भागिदारी केली तेव्हाच भारतीय क्रिकेटने त्याची दखल घ्यायला सुरूवात केली होती. हा खेळाडू सध्या अवघ्या २३ वर्षाचा असला तर भारतीय संघात कधीचाच आलाय. तो पहिला वन डे खेळलाय ते २०१९ ला तर पहिली टेस्ट खेळलाय ती २०२० ला.
A SIX to bring up his Double Hundred ??
Watch that moment here, ICYMI ??#INDvNZ #TeamIndia @ShubmanGill pic.twitter.com/8qCReIQ3lc
— BCCI (@BCCI) January 18, 2023
हल्ली आपल्याकडे एखादा नवीन खेळाडू आला की तो कसोटी क्रिकेटचा, वन-डेचा की टी२० चा असा शिक्का त्याच्यावर मारतांना प्रचंड गफलत केली जाते. १३ कसोटी खेळणाऱ्या शुभमनची सरासरी आहे ३२ आणि काल २० वा वनडे खेळतांना त्याची सरासरी होती ६८.८८. फलंदाजीत ही दोन्ही फॉरमॅटमधली त्याची संतुलीत कामगिरी शुभमनच्या गुणवत्तेची तोंड ओळख करून देण्यासाठी पुरेशी तर आहेच परंतु, त्याच बरोबर ७४ आयपीएल सामन्यातली ३२ धावांची सरासरी देखील टी२० साठी खुप आशादायक आहे.
शुभमनच्या कारकिर्दीची सुरूवात तशी अडखळत झाली आहे. परंतु, हैद्राबादला त्याने केलेल्या मोठ्या खेळीनंतर आता मात्र त्याच्याविषयीच्या अपेक्षा जाम वाढल्या आहेत. कोरोना काळात युवराजसिंग या माजी भारतीय खेळाडूने शुभमनला केवळ फलंदाजीतले कौशल्यपूर्ण बारकावेच शिकवले नाहीत तर त्याच्याकडून चांगली मेहनत देखील करून घेतली. त्यावेळेला, येत्या १० वर्षात हा खेळाडू यशाच्या शिखरावर असेल असे मत युवराजसिंगने व्यक्त केले होते. या भाकितातली सत्यता अद्याप सिद्ध व्हायची असली तरी या पहिल्या मोठ्या खेळीनंतर शुभमनचा प्रवास योग्य दिशेने जातोय असे म्हणायला हरकत नाही.
2⃣0⃣0⃣ !? ?
???????? ????!??
One mighty knock! ? ?
The moment, the reactions & the celebrations ? ?
Follow the match ? https://t.co/IQq47h2W47 #TeamIndia | #INDvNZ | @ShubmanGill pic.twitter.com/sKAeLqd8QV
— BCCI (@BCCI) January 18, 2023
Cricketer Shubman Gill Success Story by Jagdish Deore