मुंबई – क्रिकेट हा भारतीयांचा श्वास असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे सहाजिकच जर एखाद्या क्रिकेटरच्या जीवनात काही गुडन्यूज असेल तर जी जाणून घेण्याबाबत क्रिकेटरसिक तितकेच उत्सुक असतात. नवोदित क्रिकेटर शार्दूल ठाकूरकडे एक गोड बातमी आहे. तो विवाह बंधनात अडकला आहे. त्याचा साखरपुडा आजच झाला आहे. गर्लफ्रेंड मिताली परुळेकर हिच्यासोबत शार्दूलचा साखरपुडा झाला आहे. अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला आहे. याच समारंभाचा एक व्हिडिओ शार्दूलने स्वतःच शेअर केला आहे. त्यास चाहत्यांची चांगलीच पसंती लाभत आहे.
शार्दूलने इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल)मधून क्रिकेटमध्ये प्रवेश केला. चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने नुकतेच शानदार अर्धशतक झळकावले. शार्दूल हा अष्टपैलू खेळाडू आहे.
बघा शार्दूल आणि मितालीच्या साखरपुड्याचा हा व्हिडिओ