इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट हा सगळ्यांचाच आवडता खेळ. क्रिकेटचा फिव्हर कुठे नाही असं नाहीच. जगभरात तर क्रिकेटचे वेड आहेच त्याहीपेक्षा कांकणभर जास्त प्रेम भारतात दिसते. अशा या क्रिकेटचा देव म्हणजेच माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर म्हणजे ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ असाच त्याचा परिचय आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर जवळजवळ सर्व मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकर हा क्रिकेटच्या इतिहासात १०० शतके झळकावणारा एकमेव खेळाडू आहे. नुकताच या खेळाडूने एक व्हिडिओ ट्विट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सचिनची सर्व प्रशंसा करीत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये, सचिन तेंडुलकर आपल्या आईला आंबा खाऊ घालताना दिसत आहे. यासोबतच त्यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी यामध्ये असे लिहिले आहे की, या हंगामातील पहिला आंबा, माझ्या जीवनातील खास व्यक्तीसाठी … या व्हिडिओच्या सुरुवातीस सचिन तेंडुलकर प्लेटमध्ये आंबे घेतो आणि त्याच्या आईकडे जातो. त्यानंतर मास्टर ब्लास्टरची आई प्लेटमधून आंबा काढून घेते. सचिन तेंडुलकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. सोशल मीडिया चाहते कमेंट करुन मास्टर ब्लास्टरचे कौतुक करीत आहेत.
सचिन तेंडुलकरच्या या व्हिडिओला अवघ्या एका तासात सुमारे १६ हजार लाइक्स मिळाल्या होत्या. या व्यतिरिक्त, सुमारे हजारो लोकांनी ट्विट पुन्हा रिट्विट केले आहे. दरम्यान भारतीय प्रसिद्ध खेळाडू म्हणून जरी सचिन नावारूपाला आलेला असला तरी आईवरचे त्याचे प्रेम तो मोकळेपणाने मांडतो असल्याचे पाहून त्याचे चाहते मात्र जाम खुश झाले आहेत.
सोशल मीडियावर माजी भारतीय क्रिकेटपटू सचिनचे बरेच फॅन फॉलोइंग आहेत. वास्तविक, सचिन तेंडुलकर सोशल मीडियावरील सर्वात जास्त फॅन फॉलोइंग खेळाडूंपैकी एक आहे. ट्विटरबद्दल सांगायचे तर सचिन तेंडुलकरचे सुमारे ३९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या व्यतिरिक्त, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मास्टर ब्लास्टर चाहत्यांची कमतरता नाही.
https://twitter.com/sachin_rt/status/1639943109462089728?s=20
Cricketer Sachin Tendulkar Video Emotional Post