मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेटपटूंना असलेले कारचे वेड जगजाहीर आहे. भारताविषयी बोलायचे झाले तर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली यांचे कारप्रेम सर्वांनाच माहिती आहे. महागड्या गाड्यांची मालिकाच त्यांच्याकडे बघायला मिळते. आता तर सचिनने आणखी एक आलिशान कार खरेदी केली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कारविषयी विशेष प्रेम आहे. तो बरीच वर्षे बीएमडब्ल्यू कंपनीचा ब्रॅंड अँबेसिडर होता. पण त्यापूर्वीच त्याच्या घरी या कंपनीच्या कार खरेदी केलेल्या होत्या. सचिनकडे असलेले कारचे कलेक्शन कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. BMW 7-Series Li, BMW X5M, BMW i8, आणि BMW 5-Series च्या नवीन मॉडेल्स… अशी काही विशेष नावे सांगताही येतील.
त्याच्या कलेक्शनमध्ये आता आणखी एका कारची भर पडली आहे. आणि या कारच्या किंमतीत मध्यमवर्गीय माणसाला स्वीफ्ट कंपनीच्या ५० कार खरेदी करता येतील. या आलिशान लक्झरी कारचे नाव आहे Lamborghini Urus S. ही कार आपल्या खास फिचर्समुळे जगभरात लोकप्रिय आहे. आणि या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ती साडेचार कोटी रुपये आहे.
विराट, रोहितही मागे नाही
विराट कोहलीने पाच वर्षांपूर्वी बेंटले कॉन्टिनेंटल जीटी ही स्पोर्ट्स कार खरेदी केली होती. ही देशात सर्वांत महागड्या कार पैकी एक आहे. तिची किंमती देखील जवळपास चार कोटी रुपये आहे. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे सुद्धा Lamborghini Urus S आहे. ही कार १९० mph वेगाने धावते. केवळ साडेतीन सेकंदांत ० ते ६० मैल प्रतितास वेग पकडते.
Cricketer Sachin Tendulkar New Car Worth