महाबळेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियन प्रिमिअर लिगचे यंदाचे सामने संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत ७ फेरे घेतले. दोघांच्या लग्नाचे सर्व विधी महाबळेश्वरमध्ये पार पडले. या वर्षी लग्नगाठ बांधणारा ऋतुराज हा पाचवा क्रिकेटपटू आहे. आयपीएलच्या अंतिम फेरीत चेन्नई जिंकल्याच्या आनंदात स्टेडियमवर उत्कर्षाही दिसली होती.
उत्कर्षा पवार
उत्कर्षा पवार ही स्वतः एक क्रिकेटर आहे आणि महाराष्ट्राकडून खेळते आहे. तिने नोव्हेंबर २०२१ मध्ये वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. शनिवारी ऋतुराजने लग्नानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यावर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दोघांचा वेडिंग लूक लोकांना खूप आवडला आहे.
फेटा
ऋतुराज गायकवाड अनेक दिवसांपासून महाराष्ट्राची क्रिकेटर उत्कर्षा पवारला डेट करत होता. उत्कर्षा त्याला पाठिंबा देण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये यायची. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. ऋतुराजने लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. पहिल्या वेडिंग लूकमध्ये दोघांनी महाराष्ट्रीयन लूक कॅरी केला आहे. क्रिकेटरने उत्कर्षाच्या साडीसोबत जुळणारा फेटा घातला होता.
नऊवारी साडी
फर्स्ट लूकमध्ये उत्कर्षाने हिरव्या रंगाची नऊवारी साडी घातली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने सोन्याचे दागिने घातले होते. तिच्या केसांमधला अंबाडा आणि त्यातली फुलं तिला आणखी सुंदर बनवत होते. मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली ऑफ-व्हाइट शेरवानी ऋतुराजने घातली होती. हिरव्या रंगाचा फेटा त्याने घातला होता.
दुसरा लूकही खूप क्यूट
दोघांच्या दुसऱ्या लूकबद्दल सांगायचे तर, ऋतुराज ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये खूपच सुंदर दिसत होता. गळ्यात मोत्यांच्या माळा आणि डोक्यावरचा फेटा त्याला शाही रूप देत होता. दुसरीकडे, उत्कर्षा ऑफ व्हाइट लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. गळ्यात हेवी नेकपीस आणि कानात जड झुमके तिला खूप सुंदर दिसत होते. तिच्या दुसऱ्या लूकमध्ये तिने आपले केस खुले ठेवले होते. जे तिच्या सौंदर्यात भर घालत होते.
Cricketer Ruturaj Gaikwad Wedding Utkarsha Pawar