गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पत्नीला भाजपचे तिकीट मिळाल्यानंतरही क्रिकेटपटू रवींद्र जडेजा टेन्शनमध्ये; पण का?

by India Darpan
नोव्हेंबर 13, 2022 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
FhLcvEQUoAAC2VL

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गुजरातची दोन टप्प्यात निवडणूक होणार असून एकूण १८२ जागा आहेत. निवडणूकीचा पहिला टप्पा दि. १ आणि दुसरा टप्पा दि. ५ डिसेंबर असणार आहे. तर मतमोजणीही दि. ८ डिसेंबरला होणार आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ८४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते भूपेंद्र यादव आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी ही जाहीर केली आहे. रविंद्र जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजाला उमेदवारी घोषित झाली असून विरोधात काँग्रेस कडून नणंदबाई उभ्या आहेत, त्यामुळे बायकोचा प्रचार करायचा की बहिणीचा? असे राजकीय संकट रविंद्र जडेजा समोर आहे.

निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रमुख पक्षांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यंदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने गुजरात निवडणुकीवर लक्ष केंद्रीय केल्याने या निवडणुकीमध्ये चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच भाजपाने गुजरात निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात भाजपकडून रिवाबा जडेजा यांना जामनगर उत्तर या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

मोरबीचे माजी आमदार कांतीलाल अमृत्या यांनी पूल कोसळल्यानंतर नागरिकांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली होती, त्यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेस हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. मात्र यावेळी आम आदमी पार्टी आणि ओवैसी यांचा पक्ष निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. मात्र राजकीय निरीक्षकांच्या मते गुजरातमध्ये मुख्य लढाई भाजपा आणि काँग्रेसमध्ये होईल.

रीवाबा जडेजा या सन २०१९ पासून भाजपचे काम करत आहेत. जामनगरच्या विकासासाठी त्यांच्याकडे अनेक प्लॅन्स आहेत, असाही त्यांनी दावा केला असून रीवाबा यांच्यासमोर त्यांची नणंदबाई नैना जाडेजाचे आव्हान आहे, नैना या काँग्रेसच्या महामंत्री आणि जामनगरच्या स्टार प्रचारक आहेत. आता येथे नैना यांच्या वहिनी म्हणजेच रीवाबा जाडेजा भाजपच्या उमेदवार आहेत. तिथेच नैना जाडेजा काँग्रेस उमेदवारासाठी दिवसरात्र प्रचार करत आहेत. जामनगरच्या जागेवरुन नणंद-भावजयीचा संघर्ष सुरु झाला आहे.

जामनगरमध्ये धर्मेंद्रसिंह जाडेजा यांचाच प्रभाव आहे. त्यांनी २०१२ काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. दरम्यान, २०१७ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि ते पुन्हा निवडून आले. यंदा मात्र भाजपने त्यांचे तिकीट कापले असून काँग्रेसने उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे रविंद्र जाडेजाचा परिवार सध्या राजकारणात चर्चेत आला आहे. आता रविंद्र जाडेजापुढे बायकोचा प्रचार करायचा की बहिणीचा? असा प्रश्न पडला आहे.

Cricketer Ravindra Jadeja Tension Politics Gujrat Election

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्मार्ट वॉच घ्यायचं आहे? २ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे आहेत बेस्ट पर्याय

Next Post

टाटांचा धमाका! आणली ही जबरदस्त CNG कार; अन्य कंपन्यांचे टेन्शन वाढले

India Darpan

Next Post
tata tiago nrg cng

टाटांचा धमाका! आणली ही जबरदस्त CNG कार; अन्य कंपन्यांचे टेन्शन वाढले

ताज्या बातम्या

Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011