इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय संघ आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा नाशिकच्या तरुणीच्या प्रेमात असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. शॉने मुंबईतील एका पबमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येची पार्टी साजरी केली. तेव्हा त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल सर्वांना दिसली. २३ वर्षीय या क्रिकेटरने पार्टीतील काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात ही तरुणी दिसत आहे. या तरुणीचे नाव निधी तापडिया असे आहे. तिच्यासोबत पृथ्वीने विविध पोज दिले आहेत.
निधी ही पृथ्वी शॉच्या अनेक इंस्टाग्राम अपडेट्समध्ये दिसली आहे. ही मिस्ट्री गर्ल “निधी तापडिया” ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण आहे याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. निधी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. विविध व्यावसायिक मोहिमांमध्ये निधी दिसली आहे. निधीने एले इंडिया आणि मन्यावर मोहे यांसारख्या प्रसिद्ध ब्रँडसाठी मॉडेलिंग सुद्धा केले आहे. निधी तापडिया ही एक इंटरनेट सेन्सेशन आहे. निधी ही मूळची नाशिकची आहे. सोशल मीडिया अॅपवर निधीचे १०३k पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. टीव्ही शो सीआयडीमध्येही तिने भूमिका केली आहे.
Cricketer Prithvi Shaw with Nashik Girl New Year Party