इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघात धडाकेबाज फलंदाज म्हणून नाव कमावणारा पृथ्वी शॉ यावा व्यक्तिगत आयुष्यात मात्र सातत्याने नो बॉलचा सामना करावा लागत आहे. अवघ्या २३व्या वर्षी त्याचा दुसऱ्यांदा ब्रेक अप झाला असून त्याची चर्चा क्रिकेटविश्वात आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात चांगलीच रंगलेली दिसत आहे.
भारताच्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून पृथ्वीने जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. आयपीएलमध्येही तो सातत्याने खेळत आहे. अगदी अलीकडेच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातही तो खेळला. सध्या तो न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात आहे, पण अंतिम अकरामध्ये अद्याप त्याला स्थान मिळालेले नाही. कारकीर्द पुढे नेण्यासाठी झटणाऱ्या पृथ्वीला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातही काही गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्याची दुसरी गर्लफ्रेंड प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री निधी तपाडिया हिच्यासोबत त्याचा ब्रेकअप झाला आहे.
निधीच्याच एका पोस्टवरून याची माहिती सर्वांना मिळाली. तिने अलीकडेच एक फोटो शेअर केला आणि त्याच्या बॅकग्राऊंडला ब्रेक-अप सॉंग सुरू ठेवलं आहे. त्यामुळे आता निधी आणि पृथ्वी एकमेकांना डेट करत नाहीत, हे स्पष्ट झालं. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे पृथ्वीभवती दुहेरी टेंशन घोंघावत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय संघात स्थान मिळविण्याची सध्या जबरदस्त स्पर्धा सुरू असताना त्याला कस लावावा लागत आहे, तर दुसरीकडे गर्लफ्रेंड सुद्धा त्याच्या आयुष्यात फार काळत टिकत नाहीयेत.
पहिलीसोबतही ब्रेक-अप
मूळची नाशिकची असलेली निधी तपाडिया ही पृथ्वी शॉची दुसरी गर्लफ्रेंड आहे. तीन वर्षांपूर्वी तो अभिनेत्री प्राची सिंग हिला डेट करत होता. तिच्यासोबतही लवकरच ब्रेक-अप झाल्यानंतर तो निधी तपाडियाला डेट करू लागला. मात्र आता दोघींसोबतही ब्रेक-अप झाल्यामुळे तो क्रिकेटवर कॉन्सन्ट्रेट करणार की त्याच्या या टेन्शनचा कामगिरीवर परिणाम होणार, हे भविष्यातच कळेल.
Cricketer Prithvi Shaw Second Break up Girl Friend