इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीम इंडियाचा लाडका, कूल आणि यशस्वी कॅप्टन म्हणून महेंद्र धोनी प्रसिद्ध आहे. त्याच्या जीवनावर याआधी एक चित्रपट येऊन गेला. तो चांगलाच हिट झाला. आता अजून एक चित्रपट येऊ घातला आहे. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ असे या चित्रपटाचे नाव असून तो पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. या चित्रपटात जान्हवी आणि राजकुमार प्रमुख भूमिकेत आहे. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा धोनीच्या आयुष्यावर आधारित असणारा दुसरा सिनेमा आहे. याआधी ‘एम.एस धोनी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सुशांत सिंह राजपूत धोनीच्या भूमिकेत होता.
चित्रपट प्रदर्शनाची तयारी पूर्ण
‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या अधिकृत पेजवर याची घोषणा करण्यात आली आहे. एक स्वप्न, ज्याचा दोन हृदयांनी पाठलाग केला, असे ट्विटद्वारे सांगण्यात आले आहे. शरण शर्मा दिग्दर्शित, राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट १५ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. जान्हवीने मे महिन्यात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. चित्रीकरण संपल्यानंतर जान्हवीने संपूर्ण टीमचे आभार मानणारी एक लांबलचक नोटही लिहिली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे जान्हवी आणि राजकुमारचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सिनेमात धोनी आणि महिमा यांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत केली आहे. या चित्रपटात राजकुमार आणि जान्हवी व्यतिरिक्त अभिलाष चौधरी, झरीना वहाब, कुमुद मिश्रा, राजेश शर्मा, पूर्णेंदू भट्टाचार्य, यामिनी दहा, हितेश भोजराज हे कलाकार आहे. जान्हवी यापूर्वी ‘मिली’ चित्रपटात दिसली होती.