नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. एमएस धोनी हे क्रिकेट विश्वातील एक मोठे नाव आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीगची चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. धोनीने या लीगमध्ये २५० सामन्यांमध्ये ५०८२ धावा केल्या आहेत. धोनीला ‘कॅप्टन कूल’ म्हणतात. विश्वचषक असो की आयपीएल, धोनी त्याच्या चमकदार कामगिरीसाठी लोकप्रिय आहे. पण एक खेळाडू असण्यासोबतच एमएस धोनी एक यशस्वी बिझनेसमन देखील आहे. एमएस धोनी करोडोंच्या मालमत्तेचा, आलिशान घर, कार आणि बाइक्सचा आलिशान कलेक्शनचा मालक आहे. सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत धोनीचा समावेश आहे. धोनी हा हॉटेलपासून ते एअरस्पेसच्या मालक सुद्धा आहे. आज जाणून घेऊया त्याविषयी…
महेंद्रसिंग धोनी हा रांचीचा रहिवासी आहे. तिथे त्याचा राजवाड्यासारखा बंगला आहे. २०१७ मध्ये धोनी या बंगल्यात शिफ्ट झाला. त्यांच्या घराचे नाव ‘कैलाशपती’ आहे. याआधी धोनी रांचीच्या हरमू हाऊसिंगमध्ये तीन मजली घरात राहत होता. धोनीचा मुंबईतही बंगला आहे. याशिवाय धोनीचा डेहराडूनमध्ये एक सुंदर बंगला आहे, जो त्याने २०११ मध्ये सुमारे १७.८ कोटी रुपयांना खरेदी केला होता.
क्रिकेटर धोनीला बाइक्सची प्रचंड आवड आहे. त्याच्या बाईक कलेक्शनमध्ये अनेक महागड्या दुचाकी आहेत. त्याच्या बाइक्समध्ये Confederate Hellcat X32, Harley Davidson Fat Boy, Kawasaki Ninja H2 यांचा समावेश आहे. माहीची पहिली बाईक Yamaha RD 350 होती. धोनीकडे खूप आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. Hummer H2, Nissan Jonga, Jeep Grand Cherokee Trackhawk, Land Rover Freelander 2, Audi Q7 या गाड्या माहीच्या बंगल्यात आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
माही क्रिकेट सामन्यांमधून मोठी कमाई करतो. भारतीय संघाचे कर्णधारपद सोडण्यापूर्वी धोनीला एका सामन्यासाठी एक कोटी रुपये फी मिळत होती. आयपीएलमधील चेन्नई संघात समाविष्ट असलेल्या माहीला १२ कोटी रुपये मिळतात. याशिवाय तो महागड्या ब्रँडच्या जाहिरातींमधून मोठी कमाई करतो. धोनी एका टीव्ही जाहिरातीसाठी ३.५ ते ६ कोटी रुपये घेतो. धोनी दरवर्षी ५० कोटींहून अधिक कमावतो.
धोनीचा रिती स्पोर्ट्स नावाच्या मॅनेजमेंट कंपनीत हिस्सा आहे. ही कंपनी जगातील अनेक दिग्गज खेळाडूंचे व्यवस्थापन कार्य हाताळते. माहीची कपडे आणि फुटवेअर ब्रँड कंपनी देखील आहे. धोनीने साथ राही फूड अँड बेव्हरेजेसमध्येही गुंतवणूक केली आहे. एमएस धोनी एका फिटनेस कंपनीचा मालक आहे. धोनीने हॉकी आणि फुटबॉल संघात गुंतवणूक केली आहे.
धोनीने बंगळुरूमध्ये ‘एमएस धोनी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम’ नावाने शाळा सुरू केली. धोनीची ड्रोन कंपनी आणि फूड कंपनीतही भागीदारी आहे. धोनीचे रांचीमध्ये माही रेसिडेन्सी नावाचे हॉटेलही आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम एस धोनीच्या एकूण मालमत्तेबद्दल बोलायचे तर, त्याच्याकडे सुमारे १०३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. आयपीएलमधून दरवर्षी १२ कोटी, १० हून अधिक कंपन्यांमध्ये कोटींची गुंतवणूक करून मोठी कमाई तो करतो आहे.