मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा गोलंदाज आणि सध्या गुजरात टायटन्सकडून दमदार कामगिरी करणारा मोहोम्मद शमी टूरवर असताना अय्याशी करतो, असा खळबळजनक आरोप त्याची पत्नी हसीन जहाँ हिने केला आहे.
हसीन जहाँ आणि शमी यांच्यातील वाद क्रिकेट चाहत्यांना नवे आहे. २०१४ मध्ये दोघांचे लग्न झाले. पण काहीच वर्षांत शमीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करीत तिने न्यायालयात धाव घेतली होती. याच कालावधीत शमीला हसीन जहाँचे आधी लग्न झाले होते हेही कळले. त्यामुळे एक अपत्य असले तरीही दोघांमधील अंतर वाढतच जात होते. तिने त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोपही केला होता. पण आता तिने शमी टूरवर असताना हॉटेलमध्ये महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवतो, असा आरोप केला आहे.
दोघेही सध्या वेगळे राहात आहेत. पण आता तिने या आरोपावरून थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल करत शमीविरोधात दाखल केलेली फौजदारी प्रकरणातील याचिका चार वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा केला आहे. शमीचे अनैतिक संबंध अजूनही कायम असून त्याने आपल्याकडे हुंड्याची मागणी केली होती, असा आरोप हसीन जहाँने केला आहे. दौऱ्यावर असताना त्याची अय्याशी सुरूच असते. विशेष म्हणजे बीसीसीआयच्या टूरवर असतो तेव्हाही दुसरा मोबाईल क्रमांकाचा वापर करून शमी अय्याशी करतो, असा आरोप तिने केला आहे.
चिअरलिडर्स होती शमीची पत्नी
हसीन जहाँ ही कोलकाता नाईट रायडर्सची चिअर लिडर होती. ती प्रोफेशनल मॉडेल होती. सोशल मिडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या फिटनेसच्या बाबतीतही ती फार कॉन्शस आहे.
Cricketer Mohammad Shami Sex Relation Hotel Girls