इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कलावंत असो वा क्रिकेटपटू या दोघांमध्ये एक गोष्ट फार कॉमन आहे आणि ती म्हणजे बायकांच्या पळवापळवीची. अर्थात नट-नट्यांशी बरोबरी करणे क्रिकेटपटूंना शक्य नाही. पण तरीही काही घटना आहेत, त्या कायम चर्चेत असतात. त्यात एक म्हणजे मुरली विजय आणि दिनेश कार्तिक आणि दुसरं म्हणजे तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा यांच्या आयुष्यात घडलेला प्रकार.
स्टार क्रिकेटपटूंची लग्नं, त्यांचे अफेयर्स कायमच चर्चेत असतात. पण ज्यांच्या फार चर्चा होत नाहीत, अश्या क्रिकेटपटूंबद्दल एखादी घटना अचानक कळते, तेव्हा साऱ्यांनाच आश्चर्य वाटत असते. काही वर्षांपूर्वी जेव्हा मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांच्याबदद्ल लोकांना कळले तेव्हा असेच आश्चर्य वाटले होते. दिनेश कार्तिकची बायको आणि मुरली विजय यांच्यात कधी अफेयर सुरू झाले आणि कधी त्यांनी लग्न केले हे कळले सुद्धा नाही. अर्थात याची माहिती दिनेश कार्तिकला होती. पण घडलेला प्रकार फार वेगळा आहे.
मुरली विजयने पहिले दिनेश कार्तिकसोबत कौटुंबिक जवळिक वाढवली. त्यानंतर सातत्याने त्यांच्या कौटुंबिक भेटी होऊ लागल्या. या भेटींमध्ये मुरली विजय आणि दिनेशच्या पत्नीमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीचा परिणाम असा काही झाला की मुरली आणि दिनेशच्या बायकोचे अफेयर सुरू झाले. पुढे तिने दिनेशसोबत घटस्फोट घेऊन मुरली विजयसोबत संसारच थाटला. ऐकायला विचित्र वाटत असेल, पण हेच सत्य आहे.
दिलशानसोबत तसेच झाले
श्रीलंकेचा सुपरस्टार फलंदाज तिलकरत्ने दिलशान माहिती नाही, अशी एकही व्यक्ती जगात नाही. दिलशान फलंदाजीला आला की जोरदार फटकेबाजी सुरू होणार, हे माहिती असायचे. २०१४ चा टी-२० वर्ल्ड कपही लंकेने त्याच्याच जोरावर जिंकला होता. पण या दिलशानच्या नाकाखालून त्याची बायको पळविण्याचे काम त्याचाच सहकारी उपुल थरंगाने केले.
काय केले थरंगाने
दिलशान आणि त्याची पत्नी निलांका यांचा संसार छान चालला होता. पण या संसारात एका दौऱ्यादरम्यान उपुल थरंगाची एन्ट्री झाली. या दौऱ्यात निलांकासोबत त्याची छान मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि याची खबर दिलशानला लागली. त्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण दिलशानला धोखा देणाऱ्या त्याच्या बायकोने पोटगीचा अधिकार काही सोडला नाही. तिला आजही दिलशानकडून पोटगी मिळते.
Cricketer Marries with Friend Wife Interesting