नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैयक्तिक कर्तृत्व सिद्ध केल्यानंतरही काही महानलोकं नथांबता आपल्याअस्तित्वाचा समाजाला कसा उपयोगहोईल ह्याचाविचार करतात. जग विख्यात क्रिकेटपटू कपिल देवह्यांचेही तसेचआहे. शनिवारी एका समारंभासाठी नाशिकला आलेले असताना कपिल देव यांनी अशोका ग्रुप ऑफ स्कुलच्या अद्ययावत सुविधांची परिपूर्ण अश्या अर्जुन नगर कॅम्पसला भेट दिली, याठिकाणी उपस्थीत विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याशी त्यांनी आपल्या जीवनप्रवासा संदर्भांत दिलखुलास संवाद साधला. यावेळी आशिष कटारिया (संचालक अशोका बिल्डकॉन) आणि श्रीकांत शुक्ला (सचिव, अशोका एज्युकेशन फाऊंडेशन) यांनी कपिल देव यांचा सत्कार केला.
यावेळी कपिल देव यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला तसेच खेळ आणि व्यक्तिमत्व विकास या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.जीवनात कधीही स्वाक्षरी मागू नका तर स्वतःच्या कर्तुत्वाने इतके मोठे व्हा की तुमची स्वाक्षरी लोकांनी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन भारताचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांनी अशोका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी परिसंवदा दरम्यान केले.
आपली आवड कशात आहे हे ओळखायला शिकले पाहिजे आणि त्या क्षेत्रात प्रचंड मेहनत करून यश आपलेसे केले पाहिजे असे ते म्हणाले.
ह्या संदर्भात बोलताना त्यांनी एक छोटेसे उदाहरण दिले त्यांच्याकडे एक बाई आल्या आणि म्हणाल्या, “ माझ्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचे आहे कृपया त्याला मार्गदर्शन करा ….अहो त्याला तुम्ही काहीही विचारा तो तुम्हाला क्रिकेट बद्दल सर्व काही अगदी सर्व तांत्रिक बाबी देखील सांगू शकेल! ” यावर कपिल जी त्यांना म्हणाले, “बहुतेक त्याला क्रिकेटपटू नव्हे तर हर्षा भोगले सारखे समीक्षक व्हायचे आहे.
आज सर्वच आई वडिलांना वाटते की माझ्या मुलाने डॉक्टर इंजिनियर व्हायला हवे ते चुकीचे नाही प्रत्येक आई-वडिलांना मुलाचे चांगलेच हवे असते .तुम्ही काहीही करा , परंतु एका खेळाडू वृत्तीने जीवन जगायला शिका जीवनात यश अपयश येतच राहतील परंतु निराश न होता कर्म करत रहा यश नक्कीच मिळेल.
ज्याला स्वतःच्या मेहनतीवर विश्वास आहे ती लोकं प्लॅन बी बनवत बसत नाही कारण त्यांना आपल्या स्वतःवर प्रचंड विश्वास असतो …एका विद्यार्थ्याने, “ आपण जर क्रिकेटपटू झाला नसता तर काय व्हायला आवडले असते?!” असे विचारल्यानंतर त्वरित कपिल जी म्हणाले,” मी जन्मालाच आलो नसतो!” “स्वतःच्या आवडीवर विश्वास ठेवून प्रचंड मेहनत करून एका क्षेत्रात झोकून द्या बाकी कोणताही विचार करू नका कसून मेहनत घेतल्यावर कोणत्याही क्षेत्रात यश हे आहेच.”
जीवन जगताना सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला आजही आठवते, करियरच्या सुरवातीला इंग्रजीच काय मला व्यवस्थित बोलताच येत नव्हते. परंतु मी शिकायचे ठरवले आणि त्याचा परिणाम आज तुम्ही बघताच आहात. ज्ञानाची कास कधीही सोडू नका. शिकण्याची सवय कायम असूद्या. मरेपर्यंत एकच गोष्ट तुमच्या सोबत असते आणि ती म्हणजे तुम्ही मिळवलेले ज्ञान !! त्यामुळे शेवटपर्यंत ज्ञानपिपासू रहा. शिकणे कधीही सोडू नका .सतत जिज्ञासू वृत्तीने शिकत रहा.
आजकाल सर्व तरुण लवकर निराश होतात डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन हे शब्द आजकाल फॅशन झाले आहे…… आमच्या वेळी खूप खडतर जीवन होते आज तर खूप सुविधा उपलब्ध आहेत परंतु काम करण्याची ,मेहनत घेण्याची इच्छाच जर नसेल तर यश न मिळता अपयशच पदरी पडेल आणि सहाजिक निराशेचा सामना करावा लागेल.
याप्रसंगी अपर्णा मठकरी (मुख्याध्यापिका, अशोका ग्लोबल प्रीस्कूल), प्रिया डिसूझा (उपप्राचार्य, अशोका युनिव्हर्सल स्कूल), नरेंद्र तेलरांडे (प्रशासक, अशोका एज्युकेशन फाऊंडेशन), सुदिप्ता दत्ता (प्राचार्य, अशोका ग्लोबल अकादमी) आणि अनुत्तमा पंडित (उपाध्यक्ष) हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.