इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेटच्या इतिहासात अनेक खेळाडू वेगवेगळे विक्रम करत असतात. फलंदाज गोलंदाज विकेटकीपर आपापल्या नावावर विक्रम नोंदवितात जगातील अनेक देशांच्या संघांमध्ये असे खेळाडू आहेत. भारतात देखील टीम इंडिया मध्ये देखील यापूर्वी असे अनेक खेळाडू होऊन गेले असून सध्या देखील असाच विक्रम करणारे खेळाडू आहेत. त्यामध्ये आता आणखी एका नवीन खेळाडूची भर पडली आहे तो म्हणजे हार्दिक पांड्या होय.
वेस्ट इंडिज विरूद्ध दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते. पण रवींद्र जडेजाला विश्रांती दिली जाईल, याचा अंदाज कुणी बांधला नव्हता. भारतीय संघात जडेजाच्या जागी आज दिपक हुडाला संधी देण्यात आली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून प्रहार केला. किंग्सने २० चेंडूंत २० धावा करताना तीन चौकार खेचले आणि हार्दिक पांड्याने त्याची विकेट मिळवून दिली. हार्दिकची ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही पन्नासावी विकेट ठरली. वेस्ट इंडिजला ५७ धावांवर पहिला धक्का बसला. हार्दिकने या विकेटसह ऐतिहासिक कामगिरी केली.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यात ५००पेक्षा अधिक धावा आणि ५० विकेट्स घेणारा हार्दिक पांड्या हा भारताचा पहिलाच, तर जगातला दहावा अष्टपैलू खेळाडू ठरला. यापूर्वी शाकिब अल हुसैन, शाहिद आफ्रिदी, ड्वेन ब्राव्हो, जॉर्ज डॉक्रेल, मोहम्मद नबी, मोहम्मद हाफिज, केव्हिन ओ ब्रायन, थिसारा परेरा यांनी हा पराक्रम केला आहे.
https://twitter.com/FanCode/status/1554507676008165376?s=20&t=tbJLgcR__0mPe-HcEgM3Dw
सूर्यकुमार यादवने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वादळी खेळी करून मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आजच्या सामन्यातही त्याने ४४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून ७६ धावा चोपल्या. भारताने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी २० सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताने विजयासाठी दिलेले १३९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरला होता, दरम्यान फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
रोहित शर्माची दुखापत ही टीम इंडियाची चिंता वाढवणारी ठरू शकते. ५ चेंडू खेळून रोहित रिटायर्ड हर्ट झाला होता आणि सामन्यानंतर त्याने दुखापतीबाबतचे अपडेट्स दिले आहेत. भारत- वेस्ट इंडिज आता उर्वरीत दोन सामने अमेरिकेत खेळणार आहेत आणि उद्या ते रवाना होतील. आता ६ व ७ ऑगस्टला या लढती होणार आहेत.
Cricketer Hardik Pandya Record First Indian